For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एअर इंडियाला 90 लाख रुपये दंड

06:24 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडियाला 90 लाख रुपये दंड
Advertisement

अपात्र क्रू मेंबर्ससह उड्डाण केल्याचा दणका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाला 90 लाख ऊपयांचा दंड ठोठावला आहे. एअर इंडियाच्या विमानाने अपात्र क्रू मेंबर्ससह उड्डाण केल्यामुळे डीजीसीएने निष्काळजीपणाबद्दल एअर इंडियाला दणका दिला आहे. तसेच भविष्यात अशी चूक न करण्याचा इशाराही दिला.

Advertisement

एअर इंडिया लिमिटेडचे विमान एका नॉन-टेनर लाईन पॅप्टनद्वारे चालवले जात होते. हा एक गंभीर प्रकार असल्याने त्याचा सुरक्षिततेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. अनेक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियामक तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आम्हाला तपासात आढळून आले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, असे डीजीसीएने म्हटले आहे. फ्लाईट कमांडर आणि एअरलाईन्स अधिकाऱ्यांना 22 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. पण, विमान वाहतूक नियामकाला ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. यानंतर डीजीसीएने सध्याच्या नियमांनुसार कारवाई करत विमान कंपनीला दंड ठोठावला.

यापूर्वी डीजीसीएने मार्चमध्ये एअर इंडियाला 80 लाख ऊपयांचा दंड ठोठावला होता. लांब पल्ल्याच्या उड्डाणांपूर्वी वैमानिकांना आवश्यक विश्र्रांती न देणे यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअरलाईन दोषी आढळली होती. डीजीसीएला अतिरिक्त ड्युटी वेळा, ओव्हरलॅपिंग ड्युटी आणि प्रशिक्षण रेकॉर्डचे चुकीचे मार्किंग यासारख्या अनियमितता आढळल्या होत्या. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्येही एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.