एअरहोस्टेसला ऑन ड्युटी करता येते मद्यप्राशन
एका एअरलाइन्सचा अजब नियम
फ्लाइटमध्ये एअर होस्टेस किंवा क्रू मेंबरवर अनेक जबाबदाऱ्या असतात. अशा स्थितीत त्या विमानात मद्यप्राशन करत नाहीत. परंतु काही एअरलाइन्स स्वत:च्या एअरहोस्टेसना ड्युटीदरम्यान मद्यप्राशन करण्याची अनुमती देतात. एअरलाइन्सचे काही नियम असून त्याच्या अंतर्गतच क्रू मेंबर्स आणि फ्लाइट अटेंडेंट्सना मद्य पिण्याची मुभा असते.
एका प्रमुख अमेरिकन एअरलाइनच्या फ्लाइट अटेंडेंटला फ्लाय हायची संधी मिळते. युनायटेड एअरलाइन्स, एअर कॅनडामध्ये देखील कधीकधी कामादरम्यान फ्लाइट अटेंडेंट्सना मद्यप्राशनाची अनुमती दिली जाते. युनायटेड एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडेंटला उड्डाणादरम्यान किंवा गणवेशात मद्यप्राशनाची अनुमती नाही. परंतु चालक दलाचे सदस्य तांत्रिक स्वरुपात ड्युटीवर असूनही मद्याचे सेवन करू शकतात.
डेडहेडिंगदरम्यान मिळते संधी
एअरलाइन क्षेत्रात डेडहेडिंगची नावाची गोष्ट असते, ज्यात फ्लाइट अटेंडेंट किंवा पायलट कुठल्या न कुठल्या कारणाने कंपनीच्या खर्चावर कामाच्या वेळेत प्रवासी म्हणून प्रवास करत असतात. एअरलाइन्सला स्वत:च्या चालक दलाच्या सदस्यांना त्यांच्या तळावरुन दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यास किंवा तेथून परतण्यास अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते. याचमुळे अतिरिक्त क्रू मेंबर किंवा एअरहोस्टेस अन्य कुठल्याही प्रवाशाप्रमाणे सामान्य सीट्सव बसलेले असतात.
याचबरोबर कुठल्याही उड्डाणादरम्यान विमान बदलले जाते किंवा अधिक किंवा कमी क्रू मेंबर आणि फ्लाइट अटेंडेंट्सची गरज असते, किंवा एखादा कर्मचारी आचारी पडल्यास या रिप्लेसमेंट कर्मचाऱ्यांची गरज भासते. अशा स्थितीत अतिरिक्त क्रू मेंबर आणि फ्लाइट अटेंडेंट्सना विशेष परिस्थितीत काम करावे लागते, यालाच डेडहेडिंग म्हटले जाते. एखाद्या एअरहोस्टेसचे डेडहेडिंगचे काम अंतिम काळात असल्यास ती आरामात मद्यप्राशन करू शकते.