महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायुदल प्रक्षेपित करणार ‘पिक्सल’ उपग्रह

06:27 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीमेवर देखरेख ठेवणे होणार सुलभ : पुढील वर्षी होणार प्रक्षेपण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय वायुदल अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप पिक्सलकडून खरेदी करण्यात आलेल्या उपग्रहाला पुढील वर्षी प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रह प्रक्षेपणामुळे देशाच्या सीमा आणि त्यापुढील भूभागावर नजर ठेवण्याची वायुदलाची क्षमता मजबूत होणार आहे. वायुदलाने बेंगळूरमध्ये ‘पिक्सल स्पेस’सोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे. पिक्सल स्पेसची स्थापना बिट्स पलानीचे युवा उद्योजक अवैध  अहमद आणि क्षितिज खंडेलवाल यांनी केली होती.

2025 च्या अखेरपर्यंत पहिला उपग्रह आम्ही अंतराळात पाठविणार आहोत. पिक्सलचे काम उपग्रह निर्माण करणे आणि वायुदलाला सोपविणे आहे. अंतराळयानाचे संचालन वायुदल करणार आहे. वायुदलासाठी आयडीईएक्स (संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष)चा विचार केल्यास संचालन आमच्या चिंतेचा विषय नाही. उपग्रहाचे मुख्य काम सीमा, अवैध परीक्षण इत्यादींवर नजर ठेवणे असल्याचे अहमद यांनी सांगितले आहे.

संरक्षण मंत्रालायाचा पुढाकार ‘आयडीईएक्स’चा उद्देश उद्योगक्षेत्राला सामील करत संरक्षण आणि एअरोस्पेसमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी वातावरण निर्माण करणे आहे.  पिक्सलने लघू बहु-पेलोड उपग्रहाच्या पुरवठ्यासाठी आयडीईएक्स अंतर्गत वायुदलासोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराच्या अंतर्गत पिक्सल ‘इलेक्ट्रो-ऑप्टिकल’, ‘इन्फ्रारेड’, ‘सिंथेटिक एपर्चर रडार’ आणि ‘हायपरस्पेक्ट्रल’साटी 150 किलोग्रॅमपर्यंतचे छोटे उपग्रह विकसित करणार आहे. पिक्सलने 2019 मध्ये स्वत:च्या स्थापनेपासून 7 कोटी 10 लाख डॉलर्सचा निधी उभारला आहे. ही रक्कम 24 उपग्रहांच्या विकासासाठी पुरेसा असल्याचे कंपनीचे मानणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article