For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्विगीचे मूल्यांकन 15 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट

06:09 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्विगीचे मूल्यांकन 15 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट
Advertisement

देशातील सर्वात मोठा आयपीओ आणणार : फुड डिलीव्हरी क्षेत्रातील कंपनी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय खाद्य डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या आयपीओचे मूल्यांकन 15 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनी सदरच्या आयपीओच्या माध्यमातून येणाऱ्या काळात 1 ते 1.2 अब्ज डॉलर्सची रक्कम उभारणार असल्याचे समजते. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या वर्षातील सर्वात मोठी आयपीओ सदरच्या कंपनीचा बनू शकतो, असेही म्हटले जात आहे.

Advertisement

स्विगी ही भारतात ऑनलाईन रेस्टॉरंट आणि कॅफे फूड डिलिव्हरी क्षेत्रात झोमॅटो या फुड डिलिव्हरी कंपनीशी तगडी स्पर्धा करते आहे. दोन्ही कंपन्यांनी क्विक कॉमर्सवर मोठ्या प्रमाणात डाव लावला आहे. ज्या ठिकाणी दहा मिनिटांमध्ये किराणा आणि इतर साहित्याची डिलिव्हरी केली जाते.

क्वीक कॉमर्स व्यवसायासाठी रक्कम वापरणार

स्विगीने एप्रिलमध्ये आपल्या आयपीओसाठी समभागधारकांची मंजुरी मिळवली होती. यानंतर कंपनीने 1.25 अब्ज डॉलर्स यातून उभारण्याची तयारी केली होती. कंपनीने आपल्या आयपीओचे मूल्यांकन 15 अब्ज डॉलर्स इतके निश्चित केले आहे. मात्र यामध्ये ऐनवेळी बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 2022 मध्ये इन्व्हेस्को यांच्या नेतृत्वाखाली स्विगीचे निधी संकलनाचे अंतिम मूल्यांकन 10.7 अब्ज डॉलर्स इतके केले गेले होते. सदरची कंपनी आयपीओतून उभारलेल्या रकमेचा वापर क्वीक कॉमर्स क्षेत्रातील इन्स्टामार्ट व्यवसायाच्या विस्तारासाठी करणार असल्याचे समजते.

गोदामे घेण्याचा इरादा

झोमॅटो या कंपनीशी चांगली स्पर्धा करण्याच्या दृष्टीने देशभरामध्ये गोदामे घेण्याचाही विचार कंपनीने चालवल्याचे सांगितले जाते. झोमॅटोचे समभाग 2021 मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर समभाग दुपटीने वाढले आहेत. त्याचप्रमाणे या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 28 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. गोल्डमॅन सॅच यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते की क्विक डिलिव्हरीची भारतीय बाजारातील उलाढाल 11 अब्ज डॉलर्सपर्यंत असून यामध्ये ऑनलाइन ग्रोसरीची उलाढाल 5 अब्ज डॉलरची असल्याचे म्हटले आहे. 2030 पर्यंत हा वाटा 70 टक्केपर्यंत पोहोचू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.