For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलांसमोर म्यानमारविरुद्ध पहिल्या विजयाचे लक्ष्य

06:22 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलांसमोर  म्यानमारविरुद्ध पहिल्या विजयाचे लक्ष्य
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

यांगून, म्यानमार येथील थुवुन्ना स्टेडियमवर आज मंगळवारपासून सुरू होणाऱ्या दोन महिला फुटबॉल मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये भारताने म्यानमारविऊद्ध पहिला विजय नोंदविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 67 व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिलांना म्यानमारसोबतच्या (जागतिक क्रमवारीत 54 वे स्थान) त्यांच्या पाचही सामन्यांत विजय मिळविता आलेला नाही. यापैकी चार ते हरले, तर एक सामना अनिर्णीत राहिला.

यापूर्वी या दोन्ही संघांची शेवटची गाठ 2019 मध्ये मंडाले येथे झालेल्या एएफसी महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पडली होती. त्यात त्यांनी म्यानमारला 3-3 असे बरोबरीत रोखले होते. मात्र त्यास आता पाच वर्षे झाली आहेत. सध्याच्या संघातील संध्या रंगनाथन, संजू आणि नोंगमैथेम रतनबाला देवी यांनी त्या सामन्यात गोल केले हाते. त्याआधी, एएफसी महिला आशियाई चषक पात्रता (2013), एएफसी महिला ऑलिम्पिक पात्रता (2015, 2018) आणि गोल्ड कप (2019) यामध्ये भारताला चार वेळा म्यानमारचा सामना करावा लागला असता प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.

Advertisement

‘आम्ही त्यांच्याविऊद्ध यापूर्वी खेळलो आहोत. त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की, म्यानमार मजबूत संघ आहे. त्यांची गतिशीलता आणि वेग देखील चांगला आहे’, असे भारतीय ’कर्णधार लोईतोंगबम आशालता देवी यांनी सांगितले. तथापि, भारताचा शेवटचा सामना म्यानमारशी होऊन पाच वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने कर्णधाराला या दोन सामन्यांतून त्यांच्या वैऱ्याची नवीन सुऊवात होईल, असा विश्व़ास आहे. फिफा महिला आंतरराष्ट्रीय सामन्यात वरच्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्याची भारताची ही सलग दुसरी खेप आहे.

भारताने यापूर्वी 31 मे आणि 4 जून रोजी ताश्कंदमध्ये 48 व्या क्रमांकावर असलेल्या उझबेकिस्तानचा सामना केला होता. त्यापैकी एका सामन्यात त्यांना 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसरा सामना त्यांनी गोलशून्य बरोबरीत सोडविला होता. दुसरीकडे, गेल्या सप्टेंबरमध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेपासून म्यानमार संघ खेळलेला नाही. त्या स्पर्धेत कोरिया प्रजासत्ताक (0-3) आणि फिलिपीन्स (0-3) यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर ते गटस्तरावरच बाहेर फेकले गेले होते आणि त्यांचा एकमेव विजय हाँगकाँगविऊद्ध (1-0) नोंदला होता.

Advertisement
Tags :

.