महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऐहिका, श्रीजा यांचा मानांकितांना धक्का, मात्र भारत चीनकडून पराभूत

06:12 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बुसान (दक्षिण कोरीया)

Advertisement

येथे सुरु असलेल्या विश्व सांघिक टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या महिला टेबल टेनिसपटू ऐfिहिका मुखर्जी आणि श्रीजा अकुला यांनी एकेरीच्या सामन्यात अनुक्रमे चीनच्या टॉप सिडेड सन यिंग शा आणि वेंग यिदी यांना पराभवाचा धक्का दिला. पण चीनने या लढतीत भारताचा 3-2 असा पराभव केला.

Advertisement

महिला एकेरीच्या सामन्यात ऐfिहिका मुखर्जीने चीनची टॉप सिडेड सन यिंग शा हिच्यावर 12-10, 2-11, 13-11, 11-6 असा विजय मिळविला. या सांघिक विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेतील चीनच्या टॉप सिडेड सनचा हा पहिला पराभव आहे. दुसऱ्या एकेरी सामन्यात श्रीजा अकुलाने चीनच्या वेंग यिदीचा 11-7, 11-9, 13-11 असा पराभव केला. मात्र भारताच्या मनिका बात्राला आपले दोन्ही एकेरीचे सामने गमवावे लागल्याने तसेच 5 व्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात ऐfिहिकाला हार पत्करावी लागल्याने ही लढत चीनने 3-2 अशा फरकाने जिंकली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article