कोल्हापूरात प्रभातफेरीतून एड्स जनजागृती
एड्सचा मुकाबला सर्वांनी मिळून करण्याचा निर्धार
कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमधील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआरच्यावतीने शहरात प्रभात फेरी काढून एड्सबाबत जनजागृती करण्यात आले. सकाळी आठ वाजता सीपीआरमधून रॅलीची सुरूवात करण्यात आली. एड्सचा मुकाबला सर्वांनी मिळून करण्याचा निर्धार करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, डॉक्टर सहभागी झाले होते.
सीपीआर, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महापालिका येथुन सीपीआरमध्ये समारोप झाला. एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी घटत असल्याचे समाधान आहे. पण एचआयव्हीसह जगणाऱ्यांनी खचून न जाता धैर्याने मुकाबला करून सुदृढ जीवन जगावे, असे प्रतिपादन सिने अभिनेते सागर तळाशीकर यांनी केले.
आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने म्हणाले, एचआयव्ही ला घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेतल्यास याला प्रतिबंध करता येते. तरूणांनी पुढाकार घेवून याची शास्त्राrय माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी सातत्याने प्रबोधन आणि जनजागृतीमुळे जिह्याची आकडेवारी घटत होत आहे. एचआयव्ही संसर्गाची आकडेवारी गेल्या वर्षात शून्यावर येत आहे ही बाब समाधानकारक असून जिह्यातील एड्स नियंत्रण कर्मचारी व स्वयंसेवी संस्था यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी प्रास्ताविक केले. एड्स जनजागृती सप्ताहामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी एड्स मुक्तीची शपथ दिली. डी वाय पाटील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्या सादर केले. समग्र प्रकल्पच्या एचआयव्ही जागृती पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, समुपदेशक विनायक देसाई, मकरंद चौधरी जिह्यातील ए आर टी विभागाचे डॉ. ऋतुजा मोहिते, डॉ. सुभाष जगताप, डॉ. पांडुरंग पाटील यांच्यासह अभिजीत रोटे ,राजेश गोधडे ,प्रेमजीत सरदेसाई, क्रांतिसिंह चव्हाण, चंद्रकांत गायकवाड, सतीश पाटील, तुषार माळी, संदीप पाटील, दिपक सावंत, संजय गायकवाड, सुजाता पाटील, महेश्वरी करगुप्पी, श्रेया पाटील, मनीषा माने, शिल्पा अष्टेकर व कर्मचारी, यांच्यासह शहरातील नर्सिंग, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते होते.