महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शैक्षणिक संस्थांना केलेली मदत सत्कारणी लागते!

12:41 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन, डिचोली रोटरी क्लबतर्फे कोठंबी टागोर विद्यालयासाठी बांधलेल्या स्वच्छतागृहे, स्मार्ट बोर्डचे उद्घाटन

Advertisement

बोरी : रोटरी क्लब आज देशात उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच्यातच डिचोली रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय असे आहे. ज्ञानदानाचे अव्याहतपणे कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थाना केलेली मदत ही सत्कारणी लागणारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोठंबी येथील टागोर विद्यालयात काही दिवसांपूर्वीच डिचोली रोटरी क्लबने स्मार्ट बोर्ड आणि दोन स्वच्छतागृहे बांधून दिली. त्यांच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सावंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डिचोली रोटरी क्लबचे अध्यक्ष संगम फळारी, सचिव विवेक पोपकर, टागोर शैक्षणिक संस्थेचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश परब, उपसरपंच गौरांगी परब, वल्लभ साळकर, श्यामा गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, टागोर विद्यालयाला मोठी परंपरा आहे. या विद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात लौकिक वाढविताना दिसतात. या शैक्षणिक संस्थेच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संगम फळारी, यांचे क्लबच्या कार्याचा आढावा घेणारे भाषण झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्मार्ट बोर्ड आणि स्वच्छतागृहाचे अनावरण करण्यात आले. प्रकाश परब यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. अपूर्वा प्रभू यांनी सूत्रसंचालन केले तर प्रीती नाईक यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article