कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एआयसीसी कार्यदर्शी सुरजेवाला यांची आमदार सवदींच्या घरी भेट

01:01 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एआयसीसी कार्यदर्शी आणि कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी शहराला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी सदाशिवनगर येथील आमदार लक्ष्मण सवदी यांच्या निवासाला भेट देऊन चर्चा केली. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे. त्यामुळे सर्व नेते, कार्यकर्ते प्रचारकामात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर रणदीप सुरजेवाला यांनी भेट देऊन प्रचाराबाबत माहिती घेतली. मतदारसंघात मतदारांकडून मिळणारा पाठिंबा, सरकारच्या योजनांची जागृती, निवडणुकीतील प्रचाराची रणनिती याबाबत सुरजेवाला यांनी माहिती घेऊन चर्चा केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article