‘एआय’ नागरिकांच्या सेवेत मोठे बदल आणणार
जागतिक पातळीवर सहमतीची गरज : सेल्फफोर्स इंडियाच्या सीईओ अरुंधती भट्टाचार्य यांचे बदलत्या एआयवर भाष्य
नवी दिल्ली :
एआयचे सीमापार स्वरूप पाहता, जागतिक कराराची गरज आहे. एआयच्या मदतीने त्याचे फायदे संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) भारतासाठी सार्वजनिक सेवांच्या वितरणात क्रांती घडवून आणेल, असा विश्वास सेल्सफोर्स इंडियाच्या सीईओ अरुंधती भट्टाचार्य यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
एआय आरोग्यसेवेपासून शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी तयार आहे. या भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे भारताला मोठा फायदा होईल, असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञानाचे सीमापार स्वरूप आणि त्याचा प्रभाव पाहता, एआयवर जागतिक कराराची गरज आहे. परंतु चुकीच्या हातात ते हानिकारक ठरू शकते आणि म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला आहे.