कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Milk Production to AI : दुग्ध व्यवसाय, सहकारी संस्थांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा प्रवास

04:28 PM Jul 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर ही एक चौथ्या संस्थेची नितांत गरज आहे

Advertisement

By : डॉ. चेतन नरके

Advertisement

कोल्हापूर : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी 20 मे 2025 रोजी तीन नवीन बहु-राज्य सहकारी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. जनावरांचे अन्न, प्रजनन, आणि आरोग्य, शेण व्यवस्थापन आणि बायोगॅस, मृत जनावरांचा पुनर्वापर याविषयावर या संस्था काम करणार आहेत.

यामध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर ही एक चौथ्या संस्थेची नितांत गरज आहे. भारतातील बहुतांश ग्रामीण कुटुंबे शेती आणि पशुपालन करून आपला उदरनिर्वाह करतात. अंदाजे 70 टक्के लोक या क्षेत्रावर अवलंबून आहेत. अमित शहा यांचा निर्णय दुग्ध व्यवसायासाठी केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर ग्रामीण भारताच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा आहे. या नव्या निर्णयाचे फायदे आणि त्याचे शेतकऱ्यांवर होणारा परिणाम तसेच याला जोडून एक नवी कल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर या सविस्तर माहिती पाहणार आहोत.

भारतातील दुग्ध व्यवसाय :

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. जगात तयार होणाऱ्या एकूण दुधाच्या सुमारे 23 टक्के दूध भारतात तयार होते. यामध्ये 80 दशलक्षांहून अधिक ग्रामीण कुटुंबे सहभागी आहेत. पण, काही अडचणी अजूनही आहेत. प्रत्येक जनावरापासून मिळणारे दूध कमी आहे. जनावरांना पुरेसे पोषण, काळजी आणि उपचार मिळत नाहीत. दूध साठवण्यात नुकसान होते. शेण आणि मृत जनावरांचा योग्य उपयोग होत नाही.

2. सहकारी चळवळीचा इतिहास :

1970 मध्ये ‘आनंद मॉडेल’ आणि ‘अमूल’ यांच्यामुळे देशात दूध क्रांती झाली. त्यावेळी सहकारी संस्थांनी ग्रामीण विकासात मोठी भूमिका बजावली. आज त्याच चळवळीची दुसरी आवृत्ती गरजेची आहे. जी आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित आणि हवामानाशी सुसंगत असेल.

3. केंद्र सरकारचा निर्णय :

दूध उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवून देणे, पर्यावरणाची काळजी घेणे, शेणापासून बायोगॅस आणि खत तयार करणे, सहकारी संस्था तंत्रज्ञानाशी जोडणे ही नव्या निर्णयाची उदिष्टे आहेत.

4. तीन संस्थांचे कार्यक्षेत्र :

1) अन्न, प्रजनन आणि रोग नियंत्रण : वैज्ञानिक पद्धतीने अन्न पुरवणे, कृत्रिम गर्भाधान वाढवणे, रोग ओळखण्यासाठी स्थानिक माहितीचा वापर करणे. दूध उत्पादनात 20- 30 टक्के वाढ, जनावरांचा मृत्यू कमी, आणि स्थानिक वैद्यकीय सल्लागार तयार होतील.

2) शेण व्यवस्थापन आणि बायोगॅस : गावात बायोगॅस यंत्रे, शेणापासून खत तयार करणे, प्रशिक्षण आणि विपणन करणे हे आहे. यामुळे 10,000 ते 25,000 रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, एलपीजीचा खर्च कमी, स्वच्छता वाढण्यास मदत होईल.

3) मृत जनावरांचा पुनर्वापर : जनावरांचे योग्य प्रकारे संकलन, चामडे, औषधांसाठी प्रक्रिया, स्थानिक लोकांना रोजगार करणे हे आहे. यातून कचरा कमी होईल, नव्या नोकऱ्या, आणि

आर्थिक फायदा होईल.

5. पुढचा टप्पा :

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘एआय’ का वापरावा..? ‘एआय’ म्हणजे संगणकाच्या मदतीने निर्णय घेणे. हे तंत्रज्ञान जनावरांची स्थिती ओळखू शकते. योग्य अन्न आणि औषध सुचवते. दूध गोळा करण्याचा अंदाज देऊ शकते. जेणेकरुन भारत जगात आघाडीवर जाऊ शकतो.

यासाठी जनावरांचे तापमान, आरोग्य मोजणारी उपकरणे, दूध काढणाऱ्या स्वयंचलित मशीन, ड्रोन आणि सेन्सर्स आदी उपकरणांची गरज भासेल. दुधाचा मागोवा घेणारी प्रणाली, अन्न-प्रजननाचे अंदाज, स्थानिक भाषेतील प्रशिक्षण अॅप्स ही सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करावी लागणार आहे.

यासाठी परदेशातून परतलेल्या भारतीय तज्ञांची मदत घेता येईल. ‘एआय’चा सहकारी संस्थेत भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंत्यांचा सहभाग वाढवून ग्रामीण भागात प्रयोगशाळा, स्टार्टअप्स सुरू केल्याने देशभक्ती आणि कौशल्य यांचा संगम होईल.

6. जगातील उदाहरणे

1 नेदरलँड्स: आणि रोबोटच्या मदतीने दूध उत्पादन 32 लिटर/दिवस (भारत: 6-8 लिटर)

2 इस्रायल: प्रत्येक जनावराची माहिती, शून्य कचरा मॉडेल

7. शिफारसी :

एनडीडीबीमध्ये एआय विभाग सुरू करा, आयआयटी आणि कृषी विद्यापीठांसोबत संशोधन केंद्र, एआय कंपन्यांना 10 वर्षांची करसवलत, प्रत्येक सहकारी संस्थेत एआय विभाग स्थापन करावा.

Advertisement
Tags :
#agricultural#krushi#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAIbiogasDr. Chetan Narakemilk producersMilk Production to AI
Next Article