महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फायनलसाठी अहमदाबाद सज्ज

06:58 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची ग्रँड फायनल रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रणांगणात हे दोन संघ भिडणार आहेत. फायनल सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या ग्रँड फायनलसाठी बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, भारतरत्न सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांच्यासह अन्य दिग्गज खेळाडू व कलाकारांना निमंत्रण पाठवले आहे. याशिवाय, अंतिम सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेची ‘सूर्यकिरण एरोबॅटिक टीम‘ ‘एअर शो‘ सादर करणार आहे. अंतिम सामन्यासाठी अहमदाबादनगरी सज्ज झाली असून एनएसजी कमांडोसह पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

Advertisement

क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलसाठी भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल लाखभर चाहते अहमदाबादला पोहोचणार आहेत. गुजरातमधील सर्वात मोठे शहर या महान सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. स्टेडियममधील जवळपास 95 टक्के तिकीटांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून व्हीयआयपी तिकिटांचे दर लाखांच्या घरात पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदी यांना बीसीसीआयचे निमंत्रण

दरम्यान, या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय, भारतरत्न सचिन तेंडुलकर, कपिल देव, एमएस धोनी, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्यासह अनेक मान्यवरांना बीसीसीआयने निमंत्रित केले आहे. तसेच भारतीय खेळाडूंचे कुटुंबीय, बीसीसीआयचे अधिकारी, आयसीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध राज्य संघटनांचे सदस्यही अंतिम सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित राहणार आहेत.

अंतिम सामन्यापूर्वी एअर शोचा थरार रंगणार

दरम्यान, वर्ल्डकपच्या फायनलपूर्वी भारतीय वायुसेनेची ‘सूर्यकिरण एरोबॅटिक टीम‘ 19 नोव्हेंबर रोजी ‘एअर शो‘ सादर करणार आहे. संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, सूर्यकिरण एरोबॅटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 10 मिनिटांसाठी आपल्या स्टंटने लोकांना रोमांचित करेल. या एअर शोचा सराव शुक्रवार आणि शनिवारी होईल. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये सामान्यत: 9 विमानांचा समावेश असतो आणि त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत.

स्टेडियम लाईट्सने झगमगणार

फायनल सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग केली आहे. प्रेक्षकांना यामुळे आणखी चांगला अनुभव मिळेल. लाईट्ससोबतच संपूर्ण स्टेडियममध्ये ठिकठिकाणी स्पीकर्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे गाण्यांसोबतच समालोचनही चाहत्यांना ऐकता येणार आहे.

शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था

ग्रँड फायनल पाहण्यासाठी जवळपास लाखभर चाहते येण्याची शक्यता आहे. स्टेडियम आणि शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अहमदाबाद स्टेडियमची एक लाख 32 हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणारा महामुकाबला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होणार आहे. अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियमवर गुजरात पोलिस, एनएसजी, आरएएफ आणि होमगार्डसह विविध एजन्सीचे 11 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी दिली. अंतिम सामन्याचा माहोल पाहता स्टेडिअम आणि अहमदाबादला छावणीचे स्वरुप आले आहे. यासाठी एनएसजीचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

Advertisement
Next Article