महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अहिंद संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

10:22 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : महानगरपालिका, हेस्कॉम, नगरपरिषद याचबरोबर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर अनुसूचित जाती-जमातीच्या वकिलांची नेमणूक करावी. याचबरोबर नोटरी करण्यासाठीही त्यांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी अहिंद वकील संघटनेच्यावतीने महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. महानगरपालिकेमध्ये कायदा सल्लागार याचबरोबर आणखी काही वकिलांची नियुक्ती करण्यात येते. त्या ठिकाणी अनुसूचित जाती-जमातीच्या वकिलांना प्राधान्य द्यावे. सध्या बेळगाव न्यायालयामध्ये जवळपास 500 हून अधिक वकील कार्यरत आहेत. त्यामधील काही जणांना या स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियुक्त केल्यास त्याचा फायदा होणार आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना या संबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अॅड. व्ही. एस. पाटील, अॅड. एम. डी. मास्ती, अॅड. चेतन हेगडे यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article