मोदींच्या दौऱ्यापूर्वी युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला
वृत्तसंस्था/कीव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कीव दौऱ्यापूर्वी युव्रेनने रशियाच्या लष्करी तळावर प्राणघातक ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे व्रेमलिनमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रशियाच्या जमिनीवर कब्जा केल्यानंतर युव्रेनने रशियन लष्करी तळावर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. रशिया-युव्रेन युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांततेचा संदेश देऊन कीव दौऱ्यावर जात असताना युव्रेनने हा हल्ला केला आहे. रशियाच्या दक्षिणेकडील वोल्गोरोड भागात असलेल्या लष्करी तळावर गुरुवारी युव्रेनने ड्रोन हल्ला केला. हल्ल्यानंतर लष्कराच्या तळाला भीषण आग लागली. मात्र, युव्रेनच्या हल्ल्यामुळे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप कोणतीही अचूक माहिती मिळालेली नाही. रशियाच्या दक्षिण भागात झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी युव्रेनने स्वीकारलेली नाही, मात्र युव्रेनने रशियामध्ये हल्ले तीव्र केले असताना रशियात हा हल्ला झाला आहे.