संग्रहालयात तुटले 3500 वर्षे जुने पात्र
4 वर्षीय मुलाने पाडले
इस्रायलच्या संग्रहालयात चार वर्षीय मुलाकडून चुकून 3500 वर्षे जुने पात्र तुटले आहे. ही घटना इस्रायलच्या हाइफा युनिव्हर्सिटीतील हेक्ट म्युझियममध्ये घडली आहे. एलेक्स स्वत:च्या चार वर्षीय मुलासमवेत संग्रहालय पाहण्यासाठी आले होते. तेथे त्यांच्या मुलाने एका प्राचीन पात्राला चुकून पाडविले. यामुळे त्या पात्राचे अनेक तुकडे झाले.
या पात्रात काय आहे हे पाहण्याची माझ्या मुलाची इच्छा होती. यामुळे त्याने हे पात्र खेचण्याचा प्रयत्न केला आणि यातच त कोसळले. यानंतर मी तेथील सुरक्षारक्षकांना याविषयी सांगितल्याचे एलेक्स यांनी म्हटले आहे.
कांस्य युगातील पात्र
हे पात्र कांस्य युगातील होते. म्हणजेच राजा सोलोमनच्या काळापूर्वी आहे. हे पात्र सुमारे 22000 ते 1500 ख्रिस्तपूर्व काळात निर्माण करण्यात आले होते असे मानले जाते. याची वैशिष्ट्यो प्राचीन कनानशी निगडित वस्तूंशी मिळतीजुळती आहेत. या भागावर वर्तमानात इस्रायल आणि पॅलेस्टाइनचे हिस्से सामील आहेत, असे संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
पात्राचा वापर मद्य आणि तेल नेण्यासाठी केला जात असावा असा अनुमान आहे. उत्खननादरम्यान मिळणारी भांडी ही बहुधा तुटलेली किंवा अर्धवट असतात. परंतु हे पात्र सुस्थितीत आढळून आले होते, याचमुळे ते अत्यंत मूल्यवान होते. हे पात्र संग्रहालयाच्या मुख्य द्वारापाशीच ठेवण्यात आले होते. परंतु आता हे पात्र पुन्हा ठीक केले जाईल, पण ते पूर्वीसारखे होऊ शकणार नाही, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
हेक्ट म्युझियममध्ये सर्व पुरातत्व वस्तूंना काचेच्या पेटीत ठेवले जात नाही. या संग्रहालयाचे संस्थापक डॉ. रुबनेट हेक्ट यांनी ही परंपरा सुरू केली होती. खुल्या जागेत ठेवलेल्या ऐतिहासिक वस्तूंना यामुळे लोक जवळून अनुभवू शकतात असे त्यांचे मानणे होते अशी माहिती म्युझियमच्या महासंचालक डॉ. इनबल रिवलिन यांनी दिली आहे.
अनेकदा वस्तूंना जाणूनबुजून नुकसान पोहोचविले जाते. अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली जाते. परंतु याप्रकरणी असे घडले नव्हते. मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला पुन्हा संग्रहालयात बोलाविण्यात आल्याचे डॉ. रिवलिन यांनी सांगितले.