सिंगापूरमध्ये केली जात नाही शेती
सूर्याशिवाय जगाची कल्पना करू शकता का? तशाचप्रकारे शेतीशिवाय कुठल्याही देशाची कल्पना करू शकता का? जगात एक असा देश आहे, जेथे तुम्हाला शेतीच्या खुणाही दिसून येणार नाहीत. सिंगापूर हा अत्यंत विकसित देश असून तेथे शेती केली जात नसली तरीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. सिंगापूर हा जगातील सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे. याचे क्षेत्रफळ 735 चौरस किलोमीटर आहे. जगातील हा एकमात्र असा देश आहे, जेथे शेती केली जात नाही. 1965 मध्ये मलेशियापासून स्वतंत्र होत नव्या सिंगापूरचा जन्म झाला, याला सिंहांचे बेट देखील म्हटले जाते. सिंगापूरमध्ये शेती नसली तरीही हा आशियातील चौथ्या आणि जगातील नवव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश आहे. येथे गगनचुंबी इमारती आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. येथून कच्च्या मालाचा पुरवठा अन्य देशांना केला जातो. सिंगापूरमध्ये लोक स्वत:चे दैनंदिन जीवन आणि गरजा कशा पूर्ण करतात, असा प्रश्न उभा ठाकत असतो. सिंगापूरमध्ये पाणी मलेशियातून, दूध, फळे आणि भाज्या न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियातून येतात. डाळ, तांदूळ आणि अन्य गोष्टी थायलंड आणि इंडोनेशियाकडून मागविल्या जातात. 1965 मध्ये स्वतंत्र झाल्यापासून सिंगापूर हा जागतिक आर्थिक केंद्र ठरला आहे. सिंगापूरच्या कंपन्या विदेशी गुंतवणुकीसाठी ओळखल्या जातात. सिंगापूरमध्ये मोठ्या संख्येत भारतीय राहतात.