महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एमजी मोटर-व्हर्टेलो यांच्यात करार

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3000 ईव्हीचा पुरवठा करण्यासाठी हातमिळवणी

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

एमजी मोटर इंडियाने विद्युतीकरण प्लॅटफॉर्म व्हर्टेलोला टप्प्याटप्प्याने 3,000 ईव्हीचा पुरवठा करण्यासाठी प्रारंभिक करारावर स्वाक्षरी केली आहे. यासंदर्भात दोघांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एमजी मोटर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, भागीदारी लोकांना शाश्वत वाहतूक व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आहे. आम्ही देशात एक मजबूत ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेनेही काम करू असेही आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. गौरव गुप्ता, चीफ ग्रोथ ऑफिसर, एमजी मोटर इंडिया म्हणाले, ‘एमजी इंडिया आणि व्हर्टेलो यांच्यातील ही भागीदारी भारताच्या कार्बनमुक्त, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सामायिक दृष्टीकोन दर्शवते’. व्हर्टेलोचे सीईओ संदीप गंभीर म्हणाले, ‘एमजी मोटर इंडियासोबत सुमारे 3,000 इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी ही भागीदारी दोन्ही संस्थांसाठी नवीन आहे, ज्याचे उद्दिष्ट फ्लीट इलेक्ट्रिफिकेशनला गती देणे आणि निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करणे आहे असेही यावेळी स्पष्ट केले आाहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article