महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मूत भूसुरुंग स्फोटात अग्निवीर जवान हुतात्मा

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नायब सुभेदारांसह दोन जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

जम्मू विभागातील राजोरी जिल्ह्यातील नौशेरा येथे भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ गुरुवारी भूसुऊंगाचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका अग्निवीर जवानाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. फॉरवर्ड भागात सैनिक गस्तीवर असताना हा स्फोट झाला. दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांमुळे येथे सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. तसेच नजिकच येऊन ठेपलेल्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा व प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडक देखरेख करण्यात येत आहे. राजौरी जिल्ह्यातील कलाल येथे भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ पोखरा फॉरवर्ड पोस्टजवळ गस्त सुरू असताना गुऊवारी सकाळी 10.30 वाजता भूसुऊंगाचा स्फोट झाला. यात एक अग्निवीर जवान जागीच गतप्राण झाला. अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच इतर जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमी जवानाला एअरलिफ्टद्वारे उधमपूर कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पंजाबच्या लुधियाना जिह्यातील रहिवासी असलेले अग्निवीर अजय सिंह हे हुतात्मा झाल्याचे लष्करी प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. तर, कॉन्स्टेबल बळवंत जखमी झाले असून, त्यांच्यावर उधमपूर येथे उपचार सुरू आहेत. नायब सुभेदार धर्मिंदर सिंग यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर लष्करी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

भुयारी मार्ग सापडल्याने विशेष मोहीम

दुसरीकडे, जम्मू जिल्ह्याला लागून असलेल्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक संशयास्पद भुयार सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाने परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली. शोधासाठी श्वानपथक आणि आधुनिक उपकरणांची मदत घेण्यात आली. घटनास्थळी जेसीबीही मागवण्यात आला होता. सुमारे सहा तास ही मोहीम चालली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article