अग्निदिव्य’ला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद
महाराष्ट्राच्या विधीमंडळात ठिकठिकाणी झाले उदंड स्वागत
'अग्निदिव्य' राज्यातील एकमेव विशेष पुरवणी, राज्यभरात पुरवणीचे कौतुक
सातारा
महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण आणि विकासात्मक राजकारण यांच्या राजकारणातून महायुतीला प्रचंड यश मिळाले. यासंदर्भात ‘तरुण भारत’ने ‘अग्निदिव्य’ ही राज्यातील एकमेव विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. या पुरवणीला महाराष्ट्रातील वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाच याशिवाय महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात पुरवणीला उदंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी प्रमुख व सभापती राहुल नार्वेकर यांच्या समवेत श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे मुंबई प्रमुख आशिष शेलार, तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, रायगडचे आमदार भरत गोगावले, सुदामदादा गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.
विधीमंडळात सर्वांनाच ‘अग्निदिव्य’ची उत्सुकता
‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘अग्निदिव्य’ या पुरवणीची राज्यभर प्रचिती झाली होतीच. दरम्यान, या पुरवणीच्या छापील प्रति मंत्रालयात दाखल होताच अनेकांना उत्सुकता निर्माण झाली. ही पुरवणी ओबीसी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक आमदारांनी कुतुहलाने कबूल केली. रोहित आर. आर. आबा पाटील या युवा नेतृत्वानेही या पुरवणीचा विशेष सन्मान केला. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक माजी मंत्र्यांनी ही पुरवणी आवर्जुन मागितली असल्याचे दाखले आहेत.
जयाभाऊंनी केले स्वागत
भावी मंत्री समजले जाणाऱ्या जयकुमार गोरे यांना ‘अग्निदिव्य’ ही पुरवणी ठिकठिकाणी प्रकाशित होत असल्याचे समजले. आणि त्यानंतर त्यांनी संपर्क साधला. यानंतर जयकुमार गोरे यांच्या हस्ते विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘अग्निदिव्य’ या पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.
कुर्ता पायजमा घातल्यानंतर पुरवणी हाती आली
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक धक्कादायक निकाल देणारे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी पूर्वीच शपथ घेतली होती की, आमदार झाल्याशिवाय कुर्ता पायजमा घालणार नाही. आज आमदारकीची शपथ घेताना त्यांची शपथ पूर्ण झाली. त्यांनी पांढरा कुर्ता पायजमा याच्यासह फडणवीसांसारखे गुलाबी जॅकेट परिधान केले होते. आज त्यांनी या नव्या लुकमध्ये ‘अग्निदिव्य’चे प्रकाशन केले.