कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जय महाराष्ट्रविरोधी उद्योजकांच्या कारखान्यावर आंदोलन

10:58 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युवा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

Advertisement

बेळगाव : आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जय महाराष्ट्र म्हणू नका, असे म्हणणाऱ्या उद्योजकाविरोधात सर्वच स्तरातून टीकेची झोड उठविली जात आहे. या उद्योजकांचा शिनोळी, ता. चंदगड येथे कारखाना असून या कारखान्याबाहेर रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. मनोरंजनपर कुस्तीसाठी नेपाळ येथील पैलवान देव थापा आनंदवाडी येथे आला होता. यावेळी आखाड्यातील मराठमोळे वातावरण पाहून त्याच्या तोंडातून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ व ‘जय महाराष्ट्र’ असे शब्द आपसूकच निघाले. परंतु, बेळगावमधील एका उद्योजकाने थापा याच्या हातातील माईक हिसकावून जय महाराष्ट्र म्हणू नका, असे म्हणत आपण कर्नाटकात आहोत, जय हिंद म्हणा, असा सल्ला दिला. हा सल्ला न पटल्याने म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुस्ती मैदानातच उद्योजकाला धारेवर धरले. हा प्रकार घडून आठवडा उलटला तरी अद्याप त्याचे पडसाद उमटत आहेत. रविवारी म. ए. समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे जाऊन आंदोलन केले. संबंधित उद्योजकाचा शिनोळी येथे कारखाना असून महाराष्ट्राची जमीन चालते, परंतु जय महाराष्ट्र बोलण्याची कावीळ आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जय महाराष्ट्र असे लिहून उद्योजकाच्या फलकाला काळे फासण्यात आले. यावेळी युवा नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सूरज कणबरकर, प्रवीण रेडेकर, मनोहर हुंदरे, विनायक हुलजी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article