महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पेन्शन वाढवून देण्यासाठी देवदासी महिलांचे आंदोलन

10:12 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : देवदासी महिलांना सध्या राज्य सरकारकडून 1500 रुपये पेन्शन दिली जात आहे. परंतु ही पेन्शन महिलांसाठी तुटपुंजी ठरत असल्याने ती वाढवून 3 ते 5 हजार रुपये करावी, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी महिला विकास आणि संरक्षण संस्था (मास) च्यावतीने सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगावसह आसपासच्या जिल्ह्यातील देवदासी महिला उपस्थित होत्या. राज्यात 48 हजार देवदासी महिला आहेत. या महिलांना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यांना 2 एकर शेतजमिनीचे वाटप करावे. तसेच ज्यांना शेतजमिनी मिळाल्या आहेत, त्यांना कूपनलिकांसाठी अनुदान मंजूर करावे. देवदासी मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घ्यावे. सर्व देवदासी महिलांना अंत्योदय शिधापत्रिकेचे वाटप करावे. यासह विविध मागण्यांसाठी देवदासी महिलांनी आंदोलन केले. संस्थेच्या अध्यक्षा सीतव्वा जोडट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी देवदासी महिलांची भेट घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. बेळगाव, गोकाक, रायबाग, धारवाड या परिसरातील देवदासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article