For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जतमध्ये पाचव्या दिवशीही धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरूच, युवकांनी केला रास्ता रोको

07:22 PM Dec 01, 2023 IST | Kalyani Amanagi
जतमध्ये पाचव्या दिवशीही धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरूच  युवकांनी केला रास्ता रोको
Advertisement

पालकमंत्र्यांची उदासीनता, युवकांनी केला संताप व्यक्त

Advertisement

जत प्रतिनिधी

जत तहसील कार्यालयासमोर अशोक गोरड हे पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे भेट देऊन उपोषणकर्त्याला राज्य सरकारच्यावतीने आश्वस्त करतील अशी अपेक्षा होती पण भेटण्यास पालकमंत्र्यांनी नकार देत उदासीनता दाखवली. त्यानंतर युवकांनी नाराजी व्यक्त करत जत सांगली रोडवर रस्तारोको करत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

Advertisement

धनगर आरक्षण अंबलबजावणी साठी आंदोलन चालू आहे पण लोकप्रिनिधींनी याकडे पाठ फिरवली असल्याचे युवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आमदार विक्रम सावंत यांनी उपोषण कर्त्याची भेट घेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले. आंदोलनस्थळी उपोषणकर्ते अशोक गोरड यांची प्रकृती खालावल्याने यांना सलाईन लावण्यात आले.

रास्तारोको आंदोलनावेळी विक्रम ढोणे म्हणाले की धनगर समाजाची अंमलबजावणीची मागणी असताना राज्य सरकारने धनगर समाजाच्या एस टी आरक्षण समावेशाची अभ्यास समिती गठित करून धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस पाठवण्याची मागणी समाज्याच्या वतीने करण्यात आली.

पाचव्या दिवशी आमदार विक्रम सावंत, माजी सभापती आकराम मासाळ, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, संजय सावंत,आरपीआय नेते संजय कांबळे,सरपंच रमेश साबळे, बंटी दुधाळ,निलेश बामणे, आदींनी पाठिंबा दिला. आंदोलनात अशोक बंन्नेनवर,विक्रम ढोणे,मारुती सरगर,बाळू पांढरे,प्रवीण गडदे,भाऊसाहेब दुधाळ,किसन टेंगले, शंकर पारेकर,तानाजी कटरे आदींनी सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :

.