कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहिली प्रवेशासाठी वयाची अट शिथिल

06:04 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

5 वर्षे 5 महिने वय पूर्ण आवश्यक : पालकांना मोठा दिलासा : केवळ एक वर्षासाठी सूट

Advertisement

बेंगळूर : राज्यात पहिली प्रवेशासाठी असणारी सहा वर्षे वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे 1 जून 2025 रोजी 5 वर्षे 5 महिने पूर्ण असलेल्या मुलांना पहिली इयत्तेत प्रवेश देता येणार आहे. ही सवलत केवळ 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे  पालकवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शिक्षण खात्याने नोव्हेंबरमध्ये आदेश जारी करत पहिली प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण अशी अट घातली होती. त्यामुळे अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंबंधी अनेक निवेदने शिक्षण खात्याला देण्यात आली होती. त्यामुळे वयाची अट शिथिल करावी का?, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारने राज्य शिक्षण धोरण आयोगाची रचना केली होती. या आयोगाचा सल्ला आणि पालकांच्या विनंतीची दखल घेत 2025-26 या एकाच शैक्षणिक वर्षासाठी 6 वर्षे वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात आली आहे.

Advertisement

2025-26 या शैक्षणिक वर्षाआधी पूर्व प्राथमिक शिक्षण (एलकेजी किंवा तत्सम शिक्षण) पूर्ण केलेल्या आणि 1 जून रोजी 5 वर्षे 5 महिने पूर्ण केलेल्या मुलांना 2025-26 या वर्षात पहिलीत प्रवेश द्यावा, असे शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण न घेतलेल्या मुलांना थेट पहिलीत प्रवेश घेण्यासाठी 6 वर्षे वयाची अट सक्तीची आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून एलकेजी किंवा तत्समान शिक्षणासाठी 4 वर्षे पूर्ण केलेल्या व युकेजी किंवा तत्समान शिक्षण प्रवेशासाठी 5 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. यासंबंधी शिक्षण खात्याने 26 जून 2024 मध्येच आदेश जारी केला होता. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

2026-27 मध्ये सूट नाही

वयोमर्यादा अट शिथिलता 2026-27 या शैक्षणिक सालापासून असणार नाही. वयोमर्यादा अट केवळ 2025-26 या सालाकरिता असल्याचे शिक्षण खात्याने आदेशात म्हटले आहे. शिक्षण हक्क कायदा-2009, सक्तीचा शिक्षण कायदा-2012 व राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 नुसार पहिली इयत्ता प्रवेशासाठी बालक/बालिकेचे किमान वय 6 वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. मात्र, ही वयोमर्यादा अट एका वर्षापुरती शिथिल करण्यात आली असली 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून जून 1 रोजी 6 वर्षे पूर्ण असलेल्या मुलांनाच पहिलीत प्रवेश दिला जाईल.

कोणत्या अटी?

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article