For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

वय 8 महिने अन कमाई लाखोंमध्ये

06:23 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
वय 8 महिने अन कमाई लाखोंमध्ये

घरोघरी ओळखला जातो चेहरा

Advertisement

जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वत:सोबत स्वत:चे नशीब घेऊन येत असतो. याच नशीबामुळे त्याला चांगले शिक्षण आणि नोकरी मिळते असे मानले जाते. परंतु अनेकदा कुठल्याही मेहनतीशिवाय काही जणांना सर्वकाही मिळत असते. जर अत्यंत कमी वयात खूप काही मिळाले तर याला तुम्ही नशीबाशिवाय अन्य काय म्हणू शकाल?

काही जणांना नाव कमाविण्यास कित्येक वर्षे घालवावी लागतात. तर काही मुले स्वत:चे चमकणारे नशीब घेऊन येतात. एका अशी 8 महिन्यांची मुलगी स्वत:च्या आईवडिलांच्या मदतीने मोठी कमाई करत आहे. एमजे नावाची ही मुलगी अत्यंत कमी वयातच मालमत्ता अन् प्रसिद्धीची मालकीण ठरली आहे.

Advertisement

सराह लुत्जकर नावाच्या नर्सने स्वत:च्या मुलीच्या जन्मानंतरच तिला ग्लॅमर वर्ल्डमध्ये प्रवेश मिळवून दिला. एमजे 5 महिन्यांची असताना तिची छायाचित्रे मॉडेलिंग एजेन्सीला पाठविली. मुलीला तेथूनच अमेरिकेच्या दोन प्रमुख कंपन्या वॉलमार्ट आणि कॉस्टकोच्या कॅम्पेनिंगसाठी निवडण्यात आले. मुलीने त्वरित 3.5 लाख रुपयांची कमाई केली. आता ती 8 महिन्यांची झाली असून आणखी अनेक ब्रँड्ससाठी फोटोशूट करत असते. यामुळे तिला मोठी कमाई होत आहे.

Advertisement

आमची मुलगी एमजे नेहमी आनंदी असते आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेते. अडीच महिन्यांचे वय असल्यापासून तिची छायाचित्रे मॉडेलिंग एजेन्सीत पाठवत होतो. माझ्या मैत्रिणीच्या दोन्ही मुली मॉडेलिंग करतात. आता एमजे केवळ 4-5 मिनिटांच्या फोटोशूटमधूनच मोठी कमाई करत आहे. ती मोठी झाल्यावर काय करावे याचा निर्णय घेईल. मॉडेलिंग एजेन्सीकडून तिला सध्या चांगली रक्कम मिळत आहे. तसेच टिकटॉकवर तिचे असंख्य चाहते आहेत असे तिची आई सराह सांगते.

Advertisement
Tags :
×

.