महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अगरवाल, आद्या, गौशिका उपांत्यफेरीत

06:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

Advertisement

31 व्या आशियाई कनिष्ठांच्या वैयक्तिक स्क्वॅश चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचे स्क्वॅशपटू शिवेन अगरवाल, आद्या बुधिया आणि एम. गोशिका यांनी आपल्या वयोगटातून एकेरीची उपांत्यफेरी काढली आहे. या स्पर्धेतील गुरूवारचा दिवस भारतीय स्पर्धकांना संमिश्र ठरला. मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटातील सामन्यात द्वितीय मानांकित अगरवालने स्थानिक अब्दुल बटचा 11-4, 11-7, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. तर मुलींच्या 13 वर्षाखालील वयोगटात भारताच्या आद्या बुधिया आणि एम. गोशिका यांनी  प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आद्याने पाकच्या मेहनुर अलीचा 11-4, 11-8, 6-11, 11-6 तर गोशिकाने हाँगकाँगच्या कॅसेडीचा 11-8, 11-9, 11-8 असा पराभव केला. मात्र या स्पर्धेत भारताच्या पाच स्पर्धकांना उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागले. मुलींच्या 19 वर्षाखालील वयोगटात जपानच्या मिडोरीकेवाने भारताच्या निरुपमा दुबेचा 11-7, 11-9, 6-11, 11-9, 11-5 असा पराभव केला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article