महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुन्हा बाजारात दोन्ही निर्देशांक घसरणीत

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 314 तर निफ्टी 109 अंकांनी प्रभावीत : एचडीएफसी बँकेचे समभाग नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

देशातील शेअर बाजारामध्ये गुऊवारच्या सत्रातदेखील सलग तिसऱ्या दिवशी घसरणीचे सत्र कायम राहिल्याचे दिसून आले. यावेळी एचडीएफसी बँकेमधील विक्रीचा प्रभाव आणि वीज कंपनीसह अन्य कंपन्यांच्या समभागांमधील विक्रीमुळे बाजारात नुकसान सत्र राहिल्याचे दिसून आले. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 313.90 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 0.44 टक्क्यांसोबत 71,186.86 वर बंद झाला आहे. टेडिंगच्या दरम्यान सेन्सेक्स काहीवेळ 835.26 अंकांवर घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 109.70 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.51 टक्क्यांसह निर्देशांक 21,462.30 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँक, एनटीपीसी, एशियन पेन्ट्स, पॉवरग्रिड कॉर्प, टायटन, इंडसइंड बँक, नेस्ले आणि माऊती सुझुकी यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. सलगची घसरण ही एचडीएफसीमध्ये राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीचे आर्थिक अहवाल सादर करण्यात येणार असून यात बँकांच्या कामगिरी संदर्भात अहवालावऊन संभ्रम निर्माण होत असल्याने एकूण कामगिरीत समभाग घसरणीत राहत आहेत.

अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये सनफार्मा, टेक महिंद्रा, टाटा मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. आशियामधील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की नुकसानीत, दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग वधारला आहे. युरोपमधील मुख्य बाजार प्रारंभीच्या काळात मिळताजुळता कल ठेवत बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.50 टक्क्यांनी वधाऊन 78.27 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. गुरुवारी निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक कमकुवत दिसून आला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक काहीशा तेजीसोबत बंद झाला होता. एलटीआय माइंट्री या कंपनीचे समभाग गुरुवारी सर्वाधिक 11 टक्के इतके घसरणीत असताना दिसले. बाजारात घसरण असतानाही ओरेकल, फिलीप्स कार्बन, शोभा, वैभव ग्लोबल, अॅप्टस व्हॅल्यू हाऊसिंग, अपोलो टायर्स आणि वेलस्पन कॉर्प यांचे समभाग 52 आठवड्याच्या उच्चांकावर व्यवहार करत होते. व्हीआयपी इंडस्ट्रिजचा समभाग मात्र 52 आठवड्याच्या नीचांकावर घसरला होता.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article