बैठक आटोपून मुख्यमंत्री थेट गोव्यात दाखल
अर्थमंत्र्यांना 10 हजार कोटींच्या मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी/ पणजी
राजस्थानमधील जैसलमेर येथे अर्थसंकल्पपूर्व बैठकीस उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांचे सहकारी काल शनिवारी सायंकाळी गोव्यात परतले. आमदार जीत आरोलकर, प्रेमेंद्र शेट आणि दाजी साळकर यांचा त्यात समावेश होता.
अर्थसंकल्पपूर्व बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे गोव्याच्या विविध मागण्यांसंबंधीचे निवेदन सादर केले. त्यात प्रामुख्याने खाजन शेती पुनऊज्जीवित करणे तसेच पर्यावरणीय आणि विकासात्मक उपक्रमांसाठी 10 हजार कोटी ऊपये देण्याची विनंती केली.
कोकण रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन तसेच नवीन रेल्वे बोगदे बांधण्यासाठी 6,500 कोटी ऊपये, पाण्याच्या जुन्या पाईप बदलण्यासाठी 1,000 कोटी, पश्चिम घाट जैविक क्षेत्र संरक्षणासाठी 1,000 कोटी, पर्यटन विकासासाठी 200 कोटी मागितले आहेत.
बैठक आटोपून मुख्यमंत्री थेट गोव्यात दाखल
दरम्यान, जैसलमेर येथील बैठक आटोपून मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांसह राजस्थानमधील काही पर्यटक आणि अन्य स्थळांना भेटी दिल्या. प्रत्यक्षात या बैठकीनंतर मुख्यमंत्री दिल्लीस जाणार होते. परंतु आपल्या कार्यक्रमात बदल करून ते सहकाऱ्यांसह पुन्हा चार्टर विमानानेच गोव्यात परतले, अशी माहिती प्राप्त झाली आहे.