Sangli News : सासरच्या पाठबळावर घेतली भरारी, लग्नानंतर शिकून सून बनली वकील
सामाजिक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील होण्याची त्यांची जिद्द होती
By : शरद माने
वाळवा : हुंडाबळी विषयावरून सामाजिक वातावरण गढूळ होताना दिसत आहे. पुण्यातील वैष्णवी हागवणे हिच्या मृत्यूमुळे ही गोष्ट जास्तच अधोरेखित झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये वाळव्यातील मोठे (कालेकर) कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला असून केवळ दहावी शिकून लग्न होऊन आपल्या सासरी आलेल्या सुनेला स्वतःची मुलगी मानून सासू, सासरे, कुटुंबियांनी आणि पतीने शिक्षणासाठी प्रोत्साहन देत वकील केले.
यामुळे मोठे-कालेकर कुटुंबांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्या निवास मोठे असे सुनेचे नाव आहे. हुंडाबळी जावू नये म्हणून शासकीय पातळीवर प्रबोधन केले जाते. गावागावात हुंडाबळी प्रबोधनात्मक नाटिका, पथनाट्य
सादर होतात व लोकांचे प्रबोधन केले जाते. परंतु हुंडाबळींची मालिका थांबायला तयार नाही.
अशा वाळव्याच्या (कालेकर) कुटुंबियांनी लग्नानंतर वकील बनवले. परिस्थितीत मोठे या सुनेला जिद्दीने विद्या या आपल्या पतीसोबत भिवंडी (ठाणे) येथे राहतात, पती खाजगी कंपनीत नोकरी करतात. सासू सासरे अल्पशिक्षित आहेत. परंतु पती आणि सासू सासरे यांनी दहावी शिकलेल्या विद्या यांना लग्नानंतर शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
सासरे वसंत सोनाप्पा मोठे (कालेकर), सासू सावित्री कालेकर हे सासू-सासरे गावाकडे शेती करतात. विद्या यांना दोन मुली आहेत. वास्तविक लग्नानंतर मुले झाल्यानंतर मुलींची शैक्षणिक प्रगती खुंटत असते. परंतु विद्या यांनी घरातली चूल-मूल, जेवण, भांडी-कुंडी आदी कामे करत. सर्वप्रथम बारावी आणि त्यानंतर पॉलिटिकल सायन्स विषय घेत ग्रॅज्युएटचे शिक्षण पूर्ण केले.
चौगुले कॉलेज ऑफ भिवंडी येथून मुंबई विद्यापीठातून त्यांनी नुकतीच काही महिन्यापूर्वी (२०२४) वकिलीची पदवी घेतली आहे. त्यांना दोन मुली असल्या तरी त्यावरच त्यांनी समाधान मानले आहे. मुलगा आणि मुलगी यामध्ये त्या फरक मानत नाहीत. पुरोगामी विचाराने त्या वाटचाल करत आहेत. मोठी मुलगी नववीत शिकत आहे. ती योगाचे ट्रेनिंग घेते.
दुसरी मुलगी सातवीत शिक्षण घेत आहे. सध्या त्या सुप्रसिद्ध वकील अॅड. सुयोग म्हात्रे यांच्याकडे प्रैक्टिस करत आहेत. समाजातील गोरगरीब कुटुंबांना न्याय कसा मिळवायचा ? हे माहीत नसतं, कोणाला भेटायचं? न्याय कशाप्रकारे मिळवून घ्यायचा हे माहित नसतं. म्हणून अनेक कुटुंबांवर अन्याय होत असतो.
अशा अनेक सामाजिक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील होण्याची त्यांची जिद्द होती. ती जिद्द पूर्ण झाली असून, आता प्रत्यक्ष समाजसेवेच्या कामाला त्या प्रारंभ करत आहेत. विद्या यांच्या या कार्याला वाळवेकरांनी सलाम केला असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाळवा येथील बजरंग गावडे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे. वाळवा येथील त्यांच्या घरी जाऊन बजरंग गावडे यांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या आहेत.