महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जीडीपीपाठोपाठ आता ‘जीएसटी’चीही मुसंडी

06:06 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोव्हेंबर 2023 मध्ये 1.68 लाख कोटी करसंकलन :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिवाळी, धनत्रयोदशी, छठपूजा या सणांबरोबरच लग्न सराईचा हंगाम सुरू झाल्याने नोव्हेंबर महिन्यात जीएसटी वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी ऊपये इतके झाले. हे संकलन मागील वषीच्या याच महिन्याच्या तुलनेत 15 टक्क्मयांनी वाढले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या विकासदराच्या (जीडीपी) पाठोपाठ आता जीएसटी संकलनाने अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) विकासदर वार्षिक आधारावर 1.3 टक्क्यांनी वाढून 7.60 टक्के राहिला आहे. जीडीपी विकासदर आरबीआयच्या अनुमानापेक्षा 1.1 टक्क्यांनी अधिक आहे.

ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात किंचित घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी ऊपये होते. वित्त मंत्रालयाने जीएसटी संकलनाचा डेटा शुक्रवारी जारी केला. त्यानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1 लाख 67 हजार 929 कोटी ऊपये आहे. हे संकलन यापूर्वीच्या ऑक्टोबर महिन्यात 1 लाख 72 हजार 003 कोटी ऊपये होते. आकडेवारीनुसार, सीजीएसटी 30,420 कोटी ऊपये, एसजीएसटी 38,226 कोटी ऊपये आणि आयजीएसटी 87,009 कोटी ऊपये इतका वसूल झाला आहे. गेल्या महिन्यात आयजीएसटी संकलन 91,315 कोटी ऊपये होते. तर उपकराचे संकलन 12,274 कोटी ऊपये झाले असून त्यातील 1036 कोटी ऊपये आयात मालावर जमा झाले आहेत.

नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनात 15 टक्क्मयांनी वाढ झाल्याचे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी ऊपयांपेक्षा जास्त होण्याची ही सहावी वेळ आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण जीएसटी संकलन 11.9 टक्क्मयांनी वाढून 13 लाख 32 हजार 440 कोटी ऊपये झाले आहे, तर मागील वषी याच कालावधीत एकूण जीएसटी संकलन 11 लाख 90 हजार 920 कोटी ऊपये होते. या आठ महिन्यात दरमहा सरासरी 1.66 लाख कोटी ऊपये जीएसटी संकलन झाले आहे. मागील वर्षाचा म्हणजे 2022-23 च्या याच कालावधीत हे प्रमाण सरासरी 1.49 लाख कोटी ऊपये होते. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 87 हजार 035 कोटी ऊपये होते. आतापर्यंतचा हा जीएसटी संकलनाचा विक्रम आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article