Solapur : सोलापुरात प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
सोलापुरातील माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश
सोलापूर : माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी-माजी पदाधिकायांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महेश कोठे गटाने मंगळवारी रात्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर बुधवारी या सर्वांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महेश कोठे यांच्याशी पूर्वी झालेल्या भेटीचा संदर्भ देत त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला. या भेटीप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी नगरसेविका कुमुद अंकारम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे, संतोष सोमा, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, अक्षय वाकसे, तुषार पवार, वासुदेव यलदंडी, दिनेश गुर्रम, दीपक राजुल, वैभव दोशी, भीमाशंकर अंकाराम, सागर भोसले, स्वप्नील वाघमारे, अमित अंकाराम, सुमीत अंकाराम, आकाश भोसले, भोजराज माने, अमित जाधव, अमर शिंदे आदी उपस्थित होते.