महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीनंतर राजकोटमध्ये विमानतळ छत कोसळले

06:40 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन दिवसांत तिसरा विमानतळ अपघात

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली आणि जबलपूरनंतर आता गुजरातमधील राजकोटमध्येही विमानतळाचे छत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी विमानतळांचे छत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे निकृष्ट कामकाजाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदैवाने दिल्ली विमानतळासारखी जीवितहानीची दुर्घटना टळली. येथील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन जुलै 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी केले होते. 1,400 कोटींहून अधिक खर्च करून या विमानतळाचा विस्तार करण्यात आला होता. आता मुसळधार पावसाच्या तडाख्यात विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला.

गुजरातमधील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच राजकोटमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलबाहेर प्रवासी पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये एका बाजूचे छत कोसळले. यापूर्वी शुक्रवारीच दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळले होते. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक लोक जखमी झाले होते. तसेच मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये गुऊवारी नव्याने बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळाच्या ड्रॉप अँड गो एरियामध्ये छत तुटल्याने पाणी भरले होते. या घटनेत प्राप्तिकर विभागाचा एक अधिकारी आणि त्याचा चालक थोडक्मयात बचावले. हा विमानतळ 450 कोटी ऊपये खर्चून बांधण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article