For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅड हनीच्या सेवनानंतर माणूस होतो अस्वस्थ

06:04 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॅड हनीच्या सेवनानंतर माणूस होतो अस्वस्थ
Advertisement

तुम्ही मधाच्या अनेक लाभांविषयी ऐकले असेल, परंतु कधी तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या मधाविषयी ऐकले आहे का? नेपाळच्या हिमालयात आढळून येणाऱ्या ‘मॅड हनी’मुळे असे घडते. हे मध खाल्ल्यावर लोक विचित्र अवस्थेत पोहोचतात, यात चक्कर येणे, उलटी होणे, भ्रम होणे आणि हृदयाची समस्या देखील निर्माण होऊ शकते.

Advertisement

मॅड हनी एक दुर्लभ प्रकारचे मध असून ते नेपाळच्या हिमालयात आढळून येणाऱ्या रोडोडेंड्रॉन फुलांमधून मधमाशांकडून मिळविले जाते. या फुलांमध्ये एक खास प्रकारचे न्यूरोटॉक्सिन असते, ज्याला ग्रेयानोक्सिन म्हटले जाते. मधमाशा या फुलांचा रस शोषून घेतात, तेव्हा हे न्यूरोटॉक्सिन त्याच्या मधात मिसळते, याचमुळे हे मध खाल्ल्यावर लोक आजारी पडत असतात.

खाल्ल्यावर काय होते?

Advertisement

मॅड हनी खाल्ल्यावर ते किती प्रमाणात खाल्ले यावर त्याचा परिणाम अवलंबूनसतो. सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात हे मध खाल्ल्यास चक्कर येणे, उटली होणे, थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये कमजोरी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु अधिक प्रमाणात सेवन केल्यास हे हृदयविकाराची समस्या, श्वसनात त्रास आणि मृत्यूचे कारण देखील ठरू शकते.

कुठून येते मॅड हनी?

नेपाळमधील गुरुंग समुदाय शतकांपासून हे मध गोळा करत आहे. अत्यंत उंचीवर असलेल्या शिखरांवरून हा मध गोळा केला जातो, हे अत्यंत धोकादायक काम आहे, गुरुंग समुदायाचे लोक या मधाला पारंपरिक औषधाच्या स्वरुपात वापरतात. हे मध अनेक आजार म्हणजेच सर्दी, खोकला आणि सांधेदुखीवर लाभदायक असतात असे त्यांचे मानणे आहे, परंतु याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही.  तर मॅड हनीची मागणी जगभरात आहे. याची दुर्लभता आणि औषधी गुणधर्मांमुळे ते अत्यंत अधिक किमतीत विकले जाते. परंतु या मधाच्या धोकादायक प्रभावांमुळे त्याच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.