महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सत्तेत आल्यावर लाल-निळी पूररेषा दुरुस्त करणार

10:22 PM Nov 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

चिपळूण येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही

Advertisement

प्रतिनिधी
चिपळूण
राज्यात सत्तेत आल्यानंतर चिपळूण शहरात महापुराच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करताना नद्यांतील गाळ उपसा, त्यांचे खोलीकरण, रूंदीकरणासह लाल व निळ्या पूररेषांची दुरूस्ती केली जाईल. त्यासाठी आवश्यक निधी देऊन चिपळूणकरांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेसाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, पूररेषांमुळे शहरातील मालमत्ता बाधित झाल्या आहेत.त्यासाठी नद्यांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्यानंतर पूररेषांची दुरूस्ती करू आणि त्यानंतर पर्यटनवाढीच्या प्रयत्न करू. महापुराच्या दृष्टीने उपाययोजनांसाठी साधारणपणे 100 कोटी निधीची आवश्यकता आहे. मात्र, पूर्ण ताकदीने आम्ही तो उभा करू. विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला संपूर्ण बहुमत मिळेल. नक्की आकडा 175 ते 180 की अधिक हे लवकरच तुम्हाला कळेल. राज्यात लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या आरोपांवर ते म्हणाले की, आम्ही ती 3 हजार रूपये देऊन सुरू करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत पाटील म्हणाले की, भुजबळ यांनी आपण तिकडे का गेलो, याची कबुलीच दिली आहे. केवळ आपले सरकार बसावे, यासाठी भाजप वेगवेगळ्या अडचणीत असलेल्या लोकांना एकत्रित आणून कशाप्रकारे जोरजबरदस्ती करत, दादागिरी करत सरकार स्थापन करते याचे हे उत्तम उदाहरण आहे. चिपळूणला राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी शरद पवारांची राष्ट्रवादी ही ओरिजनल असल्याने तुतारीचा विजय नक्की होईल, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Next Article