अॅपलनंतर आता सॅमसंगची भारतावर भिस्त
नवी दिल्ली :
आयफोन निर्माती कंपनी अॅपलने भारतात स्मार्टफोन निर्मितीवर भर दिला असून आता सॅमसंगही याच वाटेवर असल्याची माहिती आहे. अमेरिकेत विकले जाणारे स्मार्टफोन्स सॅमसंग भारतात तयार करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे व्यापार धोरण व टॅरिफ वाढीचे संकेत दिले असल्याने सॅमसंग आता याबाबत विचार करते आहे.
व्हिएतनामवरील शुल्कावर नजर
सॅमसंग सध्याला व्हिएतनाममधून स्मार्टफोन अमेरिकेला निर्यात करते आहे. पण जर का तेथून निर्यातीवर 20 टक्के टॅरिफ लागल्यास कंपनीसाठी खर्च वाढणार आहे. यामुळेच सॅमसंग आता भारतात आपल्या ग्रेटर नोएडातील कारखान्यातून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन तयार करुन पाठवण्याचा विचार करते आहे.
काय म्हणाले अध्यक्ष
सॅमसंगचे जागतिक अध्यक्ष वॉन जून चोई यांनी सांगितले की, आम्ही आधीपासूनच असे काही स्मार्टफोन बनवत आहोत जे अमेरिकेला पाठवले जात आहेत. टॅरिफसंदर्भात एखादा मोठा निर्णय झाला तर आम्ही उत्पादन भारतात घेऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत विकले जाणारे 97 टक्के आयफोन्स भारतात होत आहेत. अॅपलने मार्च ते मे 2025 दरम्यान भारतातून जितके आयफोन्स निर्यात केले त्यात 97 टक्के अमेरिकेत पाठवण्यात आले.