महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी

12:12 PM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव शहरासह उपनगरात रविवारी पावसाच्या सरी कोसळल्या. शहराच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. दुपारी ऊन आणि सायंकाळनंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे लहान विक्रेत्यांचे नुकसान झाले.गणेशोत्सवाच्या सुरुवातीला तुरळक पाऊस होता. त्यानंतर आठवडाभर कडक ऊन पडले. भातपिके सुकू लागल्याने पावसाची गरज निर्माण झाली होती. रविवारी सकाळी शहरासह तालुक्यात कडक ऊन पडले होते. दुपारी 4 नंतर आकाशात ढग जमू लागले व अचानक पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केले. शहराच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, गांधीनगर, शिवाजीनगर, धारवाड रोड, हलगा, मध्यवर्ती बसस्थानक या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. यामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरले. तसेच सायंकाळनंतर हवेमध्ये गारवा पसरला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article