महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एक दिवसाच्या तेजीनंतर बाजार पुन्हा घसरणीत

06:43 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्सची 800 अंकांवर पडझड : बजाज फायनान्स तोट्यात

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजाराने चालू आठवड्यातील पहिल्या सत्रात सोमवारी  2 टक्क्यांची तेजी प्राप्त केली होती. परंतु ती कायम ठेवण्यास दुसऱ्या सत्रात मंगळवारी मात्र बाजाराला अपयश आल्याचे दिसून आले. यामध्ये आर्थिक क्षेत्र, एफएमसीजी, औषध आणि अन्य आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या नफा वसुलीमुळे बाजारात घसरण राहिली होती.

भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा राहिला होता.  गुंतवणूकदारांनी 31 जानेवारीला युएस फेडरलच्या निर्णया अगोदरच नफावसुली सुरु केली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 801.67 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 71,139.90 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 215.00 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 21,522.10 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील टाटा मोर्ट्सचे समभाग 2 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले. कंपनीच्या बाजार भांडवलमूल्याने मारुतीला मागे टाकले आहे. यासह स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड आणि टेक महिंद्रा यांचे समभाग वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये बजाज फायनान्स 5 टक्क्यांनी प्रभवीत राहिले आहेत. यामध्ये टायटन, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका

भारतीय बाजारात 2024 च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाअगोदरच गुंतवणूकदार सावध झाल्याचे दिसून आले. यामध्ये आज अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा निर्णय येणार आहे.

गुंतवणूकदारांना 1.8 लाख कोटींचा फटका

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य मागील सत्राच्या जवळपास 377.2 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते जवळपास 375.4 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article