For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

80 वर्षांनी लागला फिनलंडच्या विमानाचा शोध

06:24 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
80 वर्षांनी लागला फिनलंडच्या विमानाचा शोध
Advertisement

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाले होते बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ हेलसिंकी

दुसऱ्या महायुद्धाशी निगडित एका रहस्याची आता उकल झाली आहे. दुसऱ्या महायुद्धात फिनलंडचे एक विमान बाल्टिक समुद्रावरून उड्डाण करत असताना सोव्हियत लढाऊ विमानांनी ते पाडविले होते. याच्याशी निगडित रहस्य 80 वर्षांनी आता दूर होणार आहे.

Advertisement

जून 1940 मध्ये विमानातून अमेरिकन तसेच फ्रेंच मुत्सद्दी प्रवास करत होत. तेव्हा सोव्हियत महासंघाकडून बाल्टिक देशांवर कब्जा करण्याच्या काही दिवसांपूवीं ते पाडविण्यात आले हेते. विमानातील सर्व 9 जण मृत्युमुखी पडले होते, ज्यात फिनिश चालक दलाचे दोन सदस्य आणि 7 प्रवासी सामील हेते.

एक अमेरिकन मुत्सद्दी, दोन प्रेंच, दोन जर्मन, एक स्वीडिश आणि एक  एस्टोनियन फिनिश नागरिक यात मारला गेला होता. एस्टोनियातील एका बचाव दलाने जंकर्स जू 52 विमानाचे हिस्से आणि अवशेष मिळाल्याचे सांगितले आहे. एस्टोनियाची राजधानी तेलिन नजीक एका छोट्या बेटासमीप 70 मीटर खोलवर हे अवशेष आढळून आले आहेत.

आम्ही शून्यापासुन सुरुवात केली आणि शोधासाठी अत्यंत वेगळा दृष्टीकोन अवलंबिल्याचे अंडरवॉटर सर्वे कंपनी टुक्रिटूड ओयूचे प्रवक्ते कॅडो पेरेमीज यांनी सांगितले आहे. एस्टोनियाहून फिनलंडच्या दिशेने जाणाऱ्या विमानाला 14 जून 1940 रोजी पाडविण्यात आली होती. त्याच्या तीन महिन्यांपूर्वी फिनलंड आणि रशिया यांच्यात एका शांतता करारावर स्वाक्षरी झाली होती.

संबंधित विमानावर सोव्हियत महासंघाच्या दोन डीबी-2 बॉम्बवर्षक विमानांनी हल्ला केला होता. फिनलंडने अधिकृत स्वरुपात विमानावरील हल्ल्याच्या तपशीलावरून अनेक वर्षांपर्यंत मौन बाळगले होते. रशियाला नाराज न करण्याची यामागे फिनलंडची भूमिका होती.

Advertisement
Tags :

.