For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागालँडच्या 8 जिल्ह्यांमध्ये ‘अफ्स्पा’चा कालावधी वाढला

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
नागालँडच्या 8 जिल्ह्यांमध्ये ‘अफ्स्पा’चा कालावधी वाढला
Advertisement

केंद्र सरकारकडून निर्णय जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्र सरकारने नागालँडमधील 8 जिल्हे आणि 21 पोलीस स्थानकांच्या क्षेत्रांना अशांत घोषित केले आहे. याचबरोबर केंद्र सरकराने या सर्व ठिकाणी पुढील 6 महिन्यांसाठी अफ्स्पाचा कालावधी वाढला आहे. यावरून केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीच्या आढाव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागालँडच्या दीमापूर, न्यूलँड, चुमौकेदिमा, मोन, किफिरे, नोकलाक, फेक आणि पेरेन जिल्ह्यांमध्ये अफ्स्पाला पुढील 6 महिन्यांसाठी वाढविण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनात म्हटले गेले आहे. याचबरोबर नागालँडच्या 5 जिल्ह्यांमधील 21 पोलीस स्थानकांच्या क्षेत्रांमध्ये अफ्स्पा लागू असणार आहे. यात कोहिमा येथील 5 पोलीस स्थानक क्षेत्र, वोखामधील तीन पोलीस स्थानक क्षेत्र आणि लोंगलेंग जिल्ह्dयातील यांगलोक पोलीस स्थानकाचा समावेश आहे. नागालँडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीच्या आढाव्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने अफ्स्पा अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्यातील 5 अन्य जिल्हे आणि 21 पोलीस स्थानकांच्या क्षेत्रांना 1 ऑक्टोबर 2023 पासून 6 महिन्यांसाठी अशांत घोषित केले होते. अफ्स्पाच्या अंतर्गत सुरक्षादलांना अशांत क्षेत्रात विशेषाधिकार प्राप्त होतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.