For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणची विजयी सलामी

06:40 AM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
अफगाणची विजयी सलामी
Advertisement

हाँगकाँगचा 94 धावांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था / अबुधाबी

2025 च्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेतील ब गटातील पहिल्या सामन्यात अफगाणने हाँगकाँगवर 94 धावांनी मोठा विजय मिळविला. या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 188 धावा जमविल्या. त्यानंतर हाँगकाँगने 20 षटकात 9 बाद 94 धावांपर्यंत मजल मारली.

Advertisement

अफगाणच्या डावात सलामीच्या अटलने नाबाद 73 धावांची खेळी केली. ओमरझाईने अर्धशतक तर मोहम्मद नबीने 33 धावांची उपयुक्त खेळी केली. अटलने 52 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 73 तर अझमतुल्ला ओमरझाईने आक्रमक फटकेबाजी करताना केवळ 21 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 53 धावा झोडपल्या. मोहम्मद नबीने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 33 धावा केल्या. गुरुबाजने 8 तर इब्राहीम झद्रनने 1, नईबने 5, करीम जनतने 2 धावा जमविल्या. कर्णधार रशिद खान 3 धावांवर नाबाद राहिला. हाँगकाँगतर्फे आयुष शुक्ला आणि किंचित शहा यांनी प्रत्येकी 2 तर अतिक इक्बालने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या अचूक गोलंदाजीसमोर हाँगकाँगला 20 षटकात 9 बाद 94 धावांपर्यंतच मजल मारता आली. हाँगकाँग संघातील बाबर हयातने 43 चेंडूत 3 षटकारासह 39 तर कर्णधार यासीम मुर्तझाने 26 चेंडूत 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. हाँगकाँगच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. हाँगकाँगच्या डावात 3 षटकार आणि 2 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे फारुकी आणि नईब यांनी प्रत्येकी 2 तर रशिद खान, नूरअहमद आणि ओमरझाई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: अफगाण 20 षटकात 6 बाद 188 (एस. अटल नाबाद 73, नबी 33, ओमरझाई 53, अवांतर 10, आयुष शुक्ला आणि किंचित शहा प्रत्येकी 2 बळी, इक्बाल 1-32), हाँगकाँग 20 षटकात 9 बाद 94 (बाबर हयात 39, यासीम मुर्तझा 16, अवांतर 10, र्पारुकी व नईब प्रत्येकी 2 बळी, ओमरझाई, रशिद खान, नूरअहमद प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.