कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिरंगी मालिकेसाठी अफगाण संघ जाहीर

06:28 AM Aug 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अफगाणिस्तानने तिरंगी वनडे मालिकेसाठी 22 सदस्यीय संघ जाहीर केला असून अनुभवी लेगस्पिनर रशिद खानकडे नेतृत्वाची धुरा सोपविली आहे. पाकिस्तान व यजमान संयुक्त अरब अमिरात हे या तिरंगी मालिकेतील अन्य दोन संघ आहेत.

Advertisement

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्टार खेळाडू अझमतुल्लाह ओमरझाइ, रहमानुल्लाह गुरबाझ, फझलहक फारूकी, मोहम्मद नबी यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाण संघाने बाद फेरी गाठली होती, त्यात या चौघांचीही कामगिरी मोलाची ठरली होती.

युवा खेळाडू वफीउल्लाह ताराखिल, अब्दुल्लाह अहमदझाई आणि बशीर अहमद यांनीही प्राथमिक संघात स्थान मिळवले आहे आणि निवड झाल्यास ते पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅपसाठी शर्यतीत असू शकतात. शारजाह येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेपूर्वी संघ दोन आठवड्यांचा प्रशिक्षण शिबिरातून जाईल, संघाचा पहिला सामना 29 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होण्राया आशिया कपपूर्वी होईल, कारण उपखंडातील संघ पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषकासाठी तयारी करतील या तिन्ही संघ दोनदा एकमेकांसमोर येतील आणि त्यानंतर अव्वल दोन संघ 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचतील.

दोन्ही संघ शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पाच वेळा टी-20 सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने तीन वेळा अफगाणिस्तानवर मात केली आहे तर दुसऱ्यांदा अफगाणिस्तानने दोन वेळा विजय मिळवला आहे.

तिरंगी मालिकेचे वेळापत्रक:

29 ऑगस्ट - अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान.

30 ऑगस्ट - युएई विरुद्ध पाकिस्तान.

1 सप्टेंबर - युएई विरुद्ध अफगाणिस्तान.

2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान.

4 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध युएई.

5 सप्टेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध युएई.

7 सप्टेंबर - अंतिम सामना.

अफगाणिस्तान प्राथमिक संघ: राशिद खान (क), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, वफीउल्लाह तरखिल, इब्राहिम झदरन, दरविश रसूली, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, नांग्याल खरोती, शराफुद्दीन अश्रफ, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, गुलबद्दीन अहमद, मुजफर नाइब, मुहम्मद नाइब, मुहम्मद नबी. फजलहक फारुकी, नवीन उल हक, फरीद मलिक, सलीम साफी, अब्दुल्ला अहमदझाई, बशीर अहमद.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article