महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नॉर्वेमधील अफगाण दूतावास बंद

06:16 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तालिबानच्या फर्मानचा दिसतोय प्रभाव

Advertisement

वृत्तसंस्था/ ओस्लो

Advertisement

लंडनंतर आता नॉर्वेमधील अफगाणिस्तानचा दूतावास बंद हेत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये बंद होत असलेल्या दूतावासांमागील कारण तालिबानचा आदेश कारणीभूत आहे. पाश्चिमात्य पुरस्कृत सरकारकडून स्थापन राजनयिक मिशन्सना मान्यता देत  नाही, त्यांच्या जागी आम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानचे दूतावास स्थापन करणार आहोत असे तालिबानी राजवटीने म्हटले होते. नॉर्वेमधील अफगाण दूतावासाने 12 सप्टेंबरपर्यंत दूतावास बंद करून तो विदेश मंत्रालयाच्या स्वाधीन केला जाणार असल्याची घोषणा केली आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानचा दूतावास, अफगाणिस्तानच्या अनेक अन्य  राजनयिक आणि कौन्सुलर मिशन्सप्रमाणे स्वत:चे कामकाज जारी ठेवणार असल्याचे अफगाण दूतावासाने म्हटले आहे. दूतावास परिसर नॉर्वेच्या विदेश मंत्रालयाला सोपविण्यात येणार आहे. यापूर्वी सोमवारी लंडनमधील अफगाण दूतावास बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. तालिबानकडून स्वत:च्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याने दूतावास बंद करण्यात येत असल्याचे ब्रिटनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. ब्रिटनने तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही.

27 सप्टेंबरला लंडन दूतावासाला टाळे

काबूलमधील तालिबानी अधिकाऱ्यांकडून स्वत:च्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलयाने लंडनमधील दूतावास 27 सप्टेंबर रोजी बंद होणार असल्याचे ब्रिटन सरकारने सोमवारी म्हटले होते. आता नॉर्वेमधील अफगाणचा दूतावास गुरुवारपासून बंद होणार आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानचा कब्जा

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला होता. त्यानंतर देशात नवे सरकार तालिबानकडून स्थापन करण्यात आले होत. तालिबान राजवटीमुळे अन्य देशांमधील अफगाण दूतावासांवर संकट उभे ठाकले होते. अफगाण दूतावासबंद करण्यासाठी तालिबानने काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article