कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफणाणी जोडप्याला दाबोळीवर अटक

01:01 PM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दाबोळीवरुन बेहरीनमार्गे जाणार होते युरोपमध्ये : बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला भारतीय पासपोर्ट, निर्वासित होऊन भारतात आले होते आश्रयाला

Advertisement

वास्को : भारताच्या आश्रयाला आलेल्या अफगाणिस्तानच्या दाम्पत्याने भारतीय नागरिकत्व नसताना भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा खळबळजनक प्रकार दाबोळी विमानतळावर उघडकीस आला आहे. या पासपोर्टद्वारे गोव्यातून बेहरीनमार्गे युरोपला उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असताना या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर दाबोळी पोलिसांनी त्यांना अटक केली. करणदीप सिंह (32) व मनदीप कौर (21) अशी त्यांची नावे असून ती दिल्लीत राहणारी आहेत. बनावर कागदपत्रांद्वारे खरा भारतीय पासपोर्ट मिळवण्याच्या या प्रकारामुळे भारतीय शासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा उघड्यावर पडला आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा हा प्रकार असल्याने तपास यंत्रणांमध्ये सध्या खळबळ माजली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास एक नवदाम्पत्य दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते. त्यांना दाबोळीहून बेहरीनमार्गे युरोपला प्रयाण करायचे होते. मात्र, पासपोर्टची पोलखोल झाल्याने त्यांचे नियोजन सफल होऊ शकले नाही.

Advertisement

अधिकारी हर्ष यांनी हेरले दाम्पत्याला 

उड्डाणापूर्वी झालेल्या इमिग्रेशन तपासणीत विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी हर्ष यांच्या चाणाक्ष नजरेने त्यांना हेरले. त्यांच्या पासपोर्टबाबत त्यांना संशय आल्याने त्या दाम्पत्याला त्यांनी काही प्रश्न केले. मात्र, ती दोघेही गोंधळलेली आढळून आल्याने त्यांच्यावर संशय बळावला. त्यानंतर झालेल्या अधिक चौकशीत त्यांनी बाळगलेला पासपोर्ट खरा भारतीय पासपोर्ट असल्याचे उघडकीस आले.

दिल्लीत मिळविला पासपोर्ट 

बनावट कागदपत्रे वापरुन मिळविलेला पासपोर्ट त्यांनी दिल्लीतच मिळवलेला आहे. मात्र, तो त्यांनी सर्व संबंधित भारतीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून मिळवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भारतीय नागरिक नसल्याने त्यांनी खोटी कागदपत्रे तयार केली. ती सर्व संबंधित खात्यांत सादर केली व सहज पासपोर्ट मिळवला. हा पासपोर्ट तयार करताना त्यांनी भारतीय पारपत्र अधिकारिणी, दिल्लीतील स्थानिक पोलिस विभाग, महानगर पालिका व आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी बऱ्याच शासकीय संस्थांना शेंडी लावल्याचे उघडकीस आले आहे.

अधिक माहितीनुसार सदर दाम्पत्य अफगाणिस्तानचे नागरिक आहे. मागच्या सात वर्षांपासून दिल्लीतील नालोई या भागात रेफुजी कॅम्पमध्ये ती दोघे आश्रयाला आहेत. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यासाठी त्यांनी अर्जही केलेला नाही. मात्र, त्यांच्याकडे अफगाणिस्तान देशाचा पासपोर्ट आहे. तो वापरायचा सोडून त्यांनी नागरिकत्व नसताना भारतीय पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला व त्यांचा प्रयत्न यशस्वीही ठरला. आधीच अफगाणिस्तानचा पासपोर्ट त्यांच्याकडे असल्याने भारतीय पासपोर्ट तयार करण्यासाठी त्यांनी दलेरसिंह सोनी व चमनजीत कौर अशा बनावट नावांचा वापर केला. मागच्या जानेवारीमध्ये त्यांनी हा पासपोर्ट मिळवला व प्रथमच त्यांनी तो वापरण्याचा प्रयत्न केला.

विविध कायद्यांखाली गुन्हे नोंद, अटक

या दाम्पत्याकडे काही विदेशी चलनही सापडले आहे. हे चलन त्यांच्याकडे कुठून आले याबाबत त्यांनी समाधानकारक माहिती तपासयंत्रणांना दिलेली नाही. विशेष म्हणजे दाम्पत्याकडे स्वीडन देशाचा व्हिसाही आहे. आतापर्यंत कस्टम विभाग, परदेशगमन विभाग, विशेष तपास पथकाने त्यांनी झडती घेतली आहे. मात्र, मारतीय पासपोर्ट त्यांनी कसा मिळवला याबाबत त्यांच्याकडून अद्याप ठोस माहिती या तपास यंत्रणांना मिळालेली नाही. दाबोळी विमानतळावरील इमिग्रेशन विभागाचे अधिकारी हर्ष यांनी या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध दाबोळी पोलिसस्थानकावर दिली होती. शनिवारी संध्याकाळपासून ती दोघेही दाबोळी पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिकत्व कायदा, भारतीय पासपोर्ट अॅक्टसह विविध कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article