माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सावंतवाडीमध्ये प्रवेश सुरू
हॉटेल उद्योगातील उज्ज्वल करिअरसाठी सुवर्णसंधी
बेळगाव : देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने वाढत असलेल्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मळगाव, सावंतवाडी ही संस्था कार्यरत आहे. सध्या शैक्षणिक वर्षासाठी बी.एस्सी., डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही संस्था राष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापन व केटरिंग तंत्रज्ञान परिषद (NCHMCT) नोयडा यांच्याशी संलग्न असून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. येथे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) नवी दिल्ली येथून पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.
संस्थेच्या व्यवस्थापनाने देशातील नामांकित पंचतारांकित हॉटेल्ससोबत सामंजस्य करार(MoU) केले असून विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट नोकरीची संधी दिली जाते. यामध्ये भारतातील तसेच मॉरिशस, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, दुबई अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल्सचा समावेश आहे. कर्मा हॉस्पिटॅलिटी ग्रुप अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण काळातच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते. अधिक माहितीसाठी www.maihm.in या वेबसाईटला भेट द्या किंवा 9373021616/9373052781 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवेशासंदर्भातील प्रश्न admission@maihm.in या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम
- बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन)
- डिप्लोमा (फूड प्रॉडक्शन/बेकरी व कन्फेक्शनरी/फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस)
- अॅडव्हान्स सर्टिफिकेट (हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स)
- सर्टिफिकेट अभ्यासक्रम (फूड प्रॉडक्शन व पॅटिसरी/फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस/हाऊसकिपिंग)
पात्रता
- पदवीधर व डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी : इयत्ता बारावी उत्तीर्ण (कोणतीही शाखा)
- सर्टिफिकेट अभ्यासक्रमांसाठी : इयत्ता दहावी उत्तीर्ण
- संस्थेचा तीन एकराहून अधिक विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर,आधुनिक प्रशिक्षण सुविधा व सुसज्ज वसतिगृहे विद्यार्थ्यांना संपूर्णपणे परिपूर्ण शैक्षणिक वातावरण प्रदान करतात.