Sangli : ताकारी सिंचन योजनेतील पंप हाऊसवर कारभार रामभरोसे; कर्मचाऱ्यांची अनुपस्थित
सिंचन योजनेचे आवर्तन १ डिसेंबरला नियोजित
देवराष्ट्रे : ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत असून आवर्तन एक डिसेंबरच्या आसपास सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे परंतु ताकारीच्या टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन येथे पाहणी केली असता येथे एकही कर्मचारी दिसून आला नाही. योजनेच्या पंपाची जबाबदारी हि यांत्रिकी विभागाकडे असून या विभागाने पंप परिचलनाची जबाबदारी बाह्य एजन्सीला दिली आहे. परंतु या एजन्सीचे ही कोणी येथे उपलब्ध नव्हते त्यामुळे ताकारी योजनेच्या पंप हाऊसचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून पंपाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
ताकारी योजनेचे टप्पा क्रमांक एक दोन तीन व चार येथील विद्युत पंप परिचलन करण्यासाठी बाह्य एजन्सीकडे काम दिले आहे तसेच साटपेवाडी येथील बंधाऱ्याचे दरवाजे परिचलन करण्याचेही काम सदर एजन्सीकडे आहे. परंतु सदर एजन्सी कडून अनुया प्रमाणात मनुष्यबळ दिले जात आहे तसेच पुरवण्यात आलेले कर्मचारीही अशिक्षित असल्याचे किंवा पंप परिचलनचे ज्ञान नसलेले लोक आहेत. योजनेचे पंप परिचलन करण्याची फार मोठी जबाबदारी व्ह्या एजन्सीकडे आहे परंतु गलथान कारभार सुरू असतानाही प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. याबाबत यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता, उप कार्यकारी अभियंता यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सूचना दिल्याची सारवासारव
एक आठवड्यापूर्वी ताकारी योजनेच्या पंप हाऊसला मी भेट दिली आहे. पंप बंद असतानाही प्रत्येक पंप हाऊस मध्ये एक परिचालक असणे गरजेचे आहे. सदरप्रकरणी माहिती घेऊन संबंधितांना योग्य सूचना देऊ.
जयंत खाडे अधीक्षक अभियंता यांत्रिकी विभाग, कोल्हापूर