For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आदित्य’ची अंतिम टप्प्याकडे वाटचाल

06:16 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘आदित्य’ची अंतिम टप्प्याकडे वाटचाल
Advertisement

7 जानेवारीला एल-1 बिंदू गाठणे अपेक्षित : सूर्य मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल-1 आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. 7 जानेवारी 2024 रोजी ते एल-1 बिंदूवर पोहोचणे अपेक्षित असल्याचे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी येथे जाहीर केले. पहिले रॉकेट लाँच होऊन 60 वर्षे झाल्यानिमित्ताने तिऊवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात इस्रोचे प्रमुख बोलत होते. ‘आदित्य’ यशस्वीपणे मार्गक्रमण करत असून त्याला सुखरुपपणे एल-1 पॉईंटवर नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

‘आदित्य’चे 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी57 च्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले होते. प्रक्षेपणानंतर 63 मिनिटे आणि 19 सेकंदांनी हे यान पृथ्वीच्या 235 किमी × 19,500 किमी कक्षेत फिरत होते. त्यानंतर वेळोवेळी कक्षा वाढवण्यात आली असून ते योग्य दिशेने वाटचाल करत आहे. एल-1 बिंदूवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव दिसत नसल्यामुळे येथून सूर्यावरील संशोधन करण्याच्या उद्देशाने ही सूर्य मोहीम भारताने हाती घेतली आहे.

Advertisement
Tags :

.