For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेयसीपेक्षाही प्रिय बाईक...

06:11 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रेयसीपेक्षाही प्रिय बाईक
Advertisement

दुचाकी किंवा बाईक हा तरुणांना प्राणप्रिय विषय असतो, असे अलिकडच्या काळात दिसत आहे. शाळा संपून महाविद्यालयात जाण्याची वेळ आली, की अनेक तरुण आपल्या मातापित्यांकडे प्रथम मागणी करतात ती बाईकची. काही तरुणांचे बाईकप्रेम तर इतके टोकाला पोहचलेले असते की आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. काही जणांच्या मते बाईक हे कोणत्याही पुरुषाचे प्रथम प्रेम असते. एकवेळ त्याचे पत्नीवाचून किंवा प्रेयसीवाचून चालू शकेल, पण बाईकचा विरह त्याला मुळीच सहन होत नाही. त्यामुळे कित्येक तरुण बाईकला जणू आपली जिवंत मैत्रिणच आहे, अशा प्रकारे तिची देखभाल करतात. तिला साधा ओरखडाही पडलेला त्यांना चालत नाही. स्वत:ची राखत नसतील, इतकी निगा ते बाईकची राखतात. अशाच बाईकप्रेमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Advertisement

या व्हिडीओत काही तरुण एका तरुणाच्या बाईकचा वाढदिवस साजरा करताना दिसून येतात. ते बाईकला हार घालतात. आरती ओवाळतात. इतकेच नव्हे, तर बाईकला चाकू बांधून एक केकही कापतात आणि नंतर तो सर्वांना वाटला जातो. आपल्याकडे वाहनांची पूजा करण्याची पद्धत आहे. तथापि, ती खंडेनवमी या एकाच दिवशी केली जाते. बाईकचा जन्मदिन साजरा करण्याचा हा प्रकार दुर्मिळ आहे. ज्या दिवशी बाईक खरेदी करुन घरात आणली, तो तिचा जन्मदिन समजून तिचा वाढदिवस करण्याचा हा प्रकार अनोखा आहे. या व्हिडीओवर अनेकांनी स्वारस्यपूर्ण प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या बाईकच्या सायलेन्सरचा उपयोग करुन एक मेणबत्तीही विझवावया हवी होती, अशी गंमतशीर प्रतिक्रिया दिली गेली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.