Aditi Tatkare: जनसेवा करणाऱ्यालाच निवडणुकीत उमेदवारी मिळणार, तटकरेंनी स्पष्टच केलं
यासह महिलांना सुरक्षा देण्यासाठी कायमच पक्षाने पुढाकार घेतला आहे
कोल्हापूर : पक्षासाठी, जनतेसाठी अविरत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी उमेदवारी देतील. नावाचे समोर आईचे नाव देत महिलांना सन्मान दिला, यासह महिलांना सुरक्षा देण्यासाठी कायमच पक्षाने पुढाकार घेतला आहे, त्यामुळे यापुढेही पक्षाला सर्वांची पसंती असेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ता परिसंवाद मेळाव्यात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे होत्या. मंत्री तटकरे म्हणाल्या, महिलांना पैसे मिळतात म्हणून अनेक कंपन्यांचे बाजारात पेव सुटले आहे. ते महिलांना सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवण्याचे काम करत आहेत. यापासून महिलांनी सावध रहावे,
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
लाडकी बहिण योजनेमुळे महिलांची आर्थिक उन्नती होत आहे. यामुळे मोठी बचत होत असून विविध कर्ज योजनाही सहज उपलब्ध होत आहेत, ही योजना भविष्यात कधीही बंद होणार नाही, याचा लाभ सर्व महिलांना मिळत असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी प्रस्ताविक केले. यावेळी माजी आमदार राजेश पाटील, शहराध्यक्ष आदिल फरास, कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा जहिदा मुजावर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शहर महिलाध्यक्ष रेखा आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्यासाठी गावात विशेष समिती
महिलांच्या सुरक्षेसाठी, त्यांना न्याय देण्यासाठी प्रत्येक गावात एक समिती असेल, यामध्ये निवृत महिला अधिकारी पदाधिकारी असतील. यामध्ये पुऊषांचाही सहभाग असेल. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना समान हक्क मिळावा, यासाठी या समिती काम करतील अशीही महिती मंत्री तटकरे यांनी दिली.