डेसिबल’द्वारे पदार्पण करणार अदिती सैगल
द आर्चीज चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली गायिका-अभिनेत्री डॉट उर्फ अदिती सैगल आगामी सायन्स फिक्शन थ्रिलर चित्रपट ‘डेसिबल’मध्ये अभिनय करणार आहे. विनीत जोशीकडून दिग्दर्शित या चित्रपटात सनी सिंह देखील आहे. विन जोस प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डेसिबल हा डॉटचा पहिला मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करू शकत नसल्याचे तिने म्हटले आहे.
एक संगीतकार म्हणून ध्वनी माझ्यासाठी पूर्वीपासूनच अत्यंत जादुई आणि महत्त्वपूर्ण आहे, याचमुळे डेसिबलची कहाणी ऐकल्यावर मी त्वरित होकार दिला. ही एक उत्तम कहाणी असून ती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी उत्सुक असल्याचे अदितीने म्हटले आहे.
डेसिबल सायन्स फिक्शन थ्रिलरपट आहे. वैज्ञानिक आणि त्याच्या सहकाऱ्याच्या प्रवासावर आधारित हा चित्रपट असून यात तो डेसिबलच्या माध्यमातून मानवीय नात्यांमधील गुंतागुंत समजून घेत असतो. विनीत जोशी यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात डॉट ही सनी सिंहसोबत दिसून येणार आहे.