‘आदि-नादिर’ करणार गोदरेजमधील 12 टक्के हिस्सेदारी खरेदी
सदरची हिस्सेदारी आरकेएनकडून ब्लॉक डीलद्वारे घेणार विकत
मुंबई :
आदि गोदरेज काही काळ गोदरेज या समूहाचे अध्यक्ष होते, पण चुलत भावासोबतच्या कटुतेमुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. आदि-नादिर गोदरेज समूह आता गोदरेज इंडस्ट्रीजमधील 12.65 टक्के भागभांडवल आरकेएन एंटरप्रायझेस कडून सेटलमेंट अंतर्गत खरेदी करणार आहे. त्यांची 12.65टक्के हिस्सेदारी 3,858 कोटी रुपयांची आहे, अशी माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली.
आदि गोदरेजचे चुलत भाऊ ऋषद नरोजी आरकेएन एंटरप्रायझेसचे मालक आहेत. आदि-नादिर गोदरेज समूह भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड अर्थात सेबीच्या आरकेएन एंटरप्रायझेसमधील भागभांडवल खरेदीसाठीच्या किंमत सूत्राचे पालन करेल.
गोदरेज इंडस्ट्रीजचा शेअर मंगळवारी 1.18 टक्के वाढून 896 रुपयांवर बंद झाला. या वर्षी गोदरेजचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्याच वेळी, एका वर्षात स्टॉक सुमारे 75 टक्के वाढला असल्याचे दिसून आले आहे.
गोदरेजचे साम्राज्य दोन कुटुंबांद्वारे चालवले जाते. त्यांचे प्रमुख चुलत भाऊ आदि गोदरेज आणि जमशेद गोदरेज आहेत. आदि गोदरेज काही काळ या समूहाचे अध्यक्ष होते, पण चुलत भावासोबतच्या कटुतेमुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. मे 2024 मध्ये, गोदरेज कुटुंबाने 127 वर्षे जुन्या गटाला दोन भागांमध्ये विभाजित करण्याचे मान्य केले होते. यात आता आदि आणि नादिर यांच्या मालकीच्या गोदरेज इंडस्ट्रीजच्या पाच सुचीबद्ध कंपन्या आहेत.
5 सुचीबद्ध कंपन्या...
? गोदरेज इंडस्ट्रीज
? गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल)
? गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल)
? गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड (जीएएल)
? एस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड