महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विठ्ठलदर्शनासाठी जादा रेल्वे सोडणार

10:08 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर-पंढरपूर मार्गावर तीन एक्स्प्रेसची सोय

Advertisement

बेळगाव : पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-पंढरपूर या मार्गावर जादा रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूरच्या एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलपासून पंढरपूरपर्यंत एक्स्प्रेस धावणार आहेत. शनिवार दि. 29 रोजी रेल्वे क्र. 06501 सायंकाळी 5.30 वाजता बेंगळूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी 11.35 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. तर परतीच्या मार्गावर 30 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता पंढरपूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे.

Advertisement

रेल्वे क्र. 06503 परतीच्या प्रवासात 29 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पंढरपूर येथून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता बेंगळूरला पोहोचेल. रेल्वे क्र. 06505 ही एक्स्प्रेस 30 जून रोजी रात्री 10 वा. बेंगळूर येथून निघणार आहे. तर परतीच्या प्रवासात दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वा. बेंगळूर येथून निघणार आहे. या रेल्वेला तुमकूर, गौरीबिदनूर, बनसंद्रा, कित्तूर, अरसीकेरे, बिरुर, चिक्कजारुर, दावणगेरे, हरिहर, राणेबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, चिंचली, उगार व मिरज असे थांबे आहेत. एकूण 20 डबे एक्स्प्रेसला जोडले असून स्लीपर तसेच एसी डबेही एक्स्प्रेसला दिल्याने विठ्ठलभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article